आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे घेता येतील श्रीदेवी यांचे अंत्यदर्शन, शेवटच्या इच्छेनुसार होणार सर्वकाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीदेवी यांच्या भाग्य बंगल्यात अंतिम दर्शनासाठीची तयारी सुरु आहे. - Divya Marathi
श्रीदेवी यांच्या भाग्य बंगल्यात अंतिम दर्शनासाठीची तयारी सुरु आहे.


श्रीदेवी यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले. निधनाच्या 72 तासांनी त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मुंबईत दाखल होणार आहे. दुबई पोलिस आणि सरकारी वकिलांनी श्रीदेवी यांचा मृत्यू संशयास्पद नसल्याचे सांगून केस बंद केली आहे. मुंबईत भाग्य बंगला येथे श्रीदेवी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. भाग्य बंगला हा श्रीदेवी यांचा जुना बंगले आहे. येथे अंत्यदर्शनाची  तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. श्रीदेवी यांच्या अखेरच्या इच्छेनुसार, पांढ-या कापडाना बंगला झाकण्यात आला आहे. उद्या सकाळी 11 च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. 


पांढरा रंग होता आवडता... 
श्रीदेवी यांचा पांढरा रंग हा अतिशय आवडीचा होता. अखेरच्या काळात सर्व काही शुभ्र रंगाचे असावे, अशी इच्छा श्रीदेवी यांनी अनेकदा त्यांच्या कुटुंबीयांकडे बोलून दाखवली होती. त्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेत वापरण्यात येणारी प्रत्येक गोष्ट ही पांढ-या रंगाची ठेवण्यात आली आहे. त्यांचा बंगला देखील पांढ-या कापडाने झाकण्यात आला आहे. शुभ्र रंगांच्या फुलांत त्या विसावणार आहेत. बंगल्याच्या चारही बाजुंनी पोलिसांचा बंदोबस्त आहे. मोठ्या संख्येत बंगल्यावर खुर्च्या मागवण्यात आल्या आहेत.  श्रीदेवीचे चाहते मोठ्या संख्येने तेथे जमण्याची शक्यता आहे.

 

बॉलिवूड सेलिब्रिटी कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी अनिल कपूर यांच्या घरी पोहोचत आहेत. आतापर्यंत अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सिकंदर खेर, मधुर भंडारकर, शाहरुख खान, गौरी खान, रजनीकांत, करिश्मा कपूर, ईशान खट्टर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, शबाना आझमी, जावेद अख्तर, मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी, कमल हसन, व्यंकटेशसह अनेक कलाकार अनिल कपूर यांच्या घरी आले होते.

 

पुढे बघा, श्रीदेवी यांच्या अंत्य दर्शनासाठी सुरु असलेल्या तयारीचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...