आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूडचा हा प्रसिद्ध पैलवान खऱ्या आयुष्यातही हरला नाही एकही कुस्ती, किंग काँगला हरवून झाले प्रसिद्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - प्रसिद्ध पहिलवान तसेच अभिनेते दारासिंह यांनी पूर्ण जगात भारताचा नावलौकिेक केलेला आहे. त्यांनी तब्बल 500 कुस्त्या न हरता जगभरात नाव कमावले. दारा सिंह यांचे निधन 83 वर्षे वयात 12 जुलै 2012 रोजी झाले होते. आज त्यांचा स्मृतिदिन असल्याने divyamarathi.com ही विशेष माहिती देत आहे.

 

लहानपणापासून कुस्तीची आवड...
दारा सिंह यांचे पूर्ण नाव होते दारा सिंह रंधावा. त्यांचा जन्म 1928 मध्ये पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला होता. दारा सिंह यांना लहानपणापासून कुस्तीची आवड होती. त्यांनी सर्वात प्रथम 1947 मध्ये सिंगापुरात मलेशियाई चॅम्पियन तरलोक सिंह यांना पछाडून आपल्या विजयी प्रवासाला सुरुवात केली होती.


किंगकाँगला चारली होती धूळ, रातोरात बनले सुपरस्टार
1954 मध्ये दारा सिंह यांनी भारतीय कुस्ती चॅम्पियनशिपचा किताब जिंकला होता. यानंतर ते कॉमनवेल्थ चॅम्पियनही बनले, परंतु दारा सिंह यांचे नाव समोर येताच सर्वांनाच त्यांच्या जागतिक चॅम्पियन किंग कांगशी झालेल्या कुस्तीची आठवण येते. या मुकाबल्यानंतरच दारा सिंह रातोंरात सुपरस्टार बनून गेले. असे म्हटले जाते की, 200 किलो वजनी किंग कांगला त्यांनी रिंगच्या बाहेर उचलून फेकले होते. किंग कांगला धूळ चारल्यानंतर दारा सिंह यांना 'रुस्तम ए हिंद'चा दर्जा मिळाला. असा एक असा रेकॉर्ड आहे, जो आजपर्यंत कुणालाही मोडता येऊ शकला नाही असे सांगितले जाते.

 

500 कुस्त्या, शेवटपर्यंत अजिंक्य
दारा सिंह यांनी तब्बल 500 कुस्त्या लढल्या आणि सर्वांमध्ये विजय मिळवला. अपराजित राहिलेल्या दारासिंह यांनी 1983 मध्ये 55 वर्षे वयात कुस्तीतून संन्यास घेतला. दारा सिंह यांनी जवळजवळ 36 वर्षांपर्यंत लालमातीत कामगिरी बजावली. अपराजित राहिल्यामुळे दारा सिंह यांचे नाव ऑब्जर्व्हर न्यूज लेटर हॉल ऑफ फेममध्ये नोंदवण्यात आलेले आहे. 2003 ते 2009 पर्यंत दारा सिंह राज्यसभेचे खासदारही राहिले.

 

अॅक्शन हीरो म्हणून प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले
कुस्तीप्रमाणेच दारा सिंह चित्रपटांतही अॅक्शन हीरो म्हणून सुपरहिट ठरले. त्यांना देशाचा पहिला ही-मॅन म्हटले जाते. रुंद खांदे आणि प्रमाणबद्ध शरीरयष्टीमुळे अॅक्शन हीरो म्हणून प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. दारा सिंह यांचा पहिला चित्रपट 1952 मध्ये 'संगदिल' या नावाने आला होता.

 

हनुमानाच्या रूपात पूजा करायचे लोक

दारा सिंह यांनी एकूण 115 चित्रपटांत भूमिका केल्या. दूरदर्शनवर प्रचंड गाजलेल्या 'रामायण' मालिकेत हनुमानाची भूमिका केल्याने घराघरांत त्यांचे फोटो पूजले जायचे. आजही लोक त्यांना हनुमानाच्या रूपात आठवतात. दारा सिंह यांचा शेवटचा यादगार चित्रपट म्हणून 'जब वी मेट'चे नाव घेतले जाते. यात त्यांनी करिना कपूरच्या आजोबांची छोटी पण दमदार भूमिका केली होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, दारा सिंह यांचे आणखी काही Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...