आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्दर्शकाच्या आईच्या शोकसभेत पोहोचले रितेश-सुनील शेट्टी, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदिती राव हैदरी, रितेश देशमुख, सिद्धार्थ रॉय कपूर, सुनील शेट्टी - Divya Marathi
आदिती राव हैदरी, रितेश देशमुख, सिद्धार्थ रॉय कपूर, सुनील शेट्टी

मुंबईः 'कल हो ना हो' या चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल आडवाणी यांच्या मातोश्री रेखा आडवाणी यांचे 8 एप्रिल रोजी निधन झाले. मंगळवारी मुंबईतील वरळीस्थित नेहरु सेंटर येथे त्यांच्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकार येथे पोहोचले आणि त्यांनी रेखा आडवाणी यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली. अभिनेता सुनील शेट्टी पत्नी माना आणि मुलगी अथिया शेट्टीसोबत येथे पोहोचले. याशिवाय पत्नी अवंतिकासोबत इमराम खान, निमरत कौर, आदिती राव हैदरी, गौरव चोप्रा, सिद्धार्थ रॉय कपूर, रितेश देशमुख, मिनी माथूर, शाकीब सलीम, चित्रांगदा सिंहसह अनेक जण या प्रेयर मीटमध्ये सहभागी झाले होते. 


रेखा यांचे झाले आकस्मिक निधन...
- निखिल आडवाणी यांच्या आईचे रविवारी आकस्मिक निधन झाले होते.
- रविवारीच रेखा आडवाणी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
- निखिल आडवाणी बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी 'कल हो न हो'शिवाय 'सलाम-ए-इश्क', 'चांदनी चौक टू चायना', 'पटियाला हाउस', 'दिल्ली सफारी', 'D-day', 'हीरो', 'कट्टी-बट्टी', 'गुड्डू इंजीनियर' सह अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, निखिल आडवाणी यांच्या मातोश्रींच्या प्रार्थना सभेत पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...