आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटकेनंतर दोन दिवसांनी सलमान खानने लिहिली इमोशनल पोस्ट, बहीणही झाली भावूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला काळवीट शिकारप्रकरणी 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवस त्याला तुरुंगाची हवाही खावी लागली होती.  50 तास तुरुंगात काढल्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला. जामीन मिळाल्यानंतर सलमान तात्काळ मुंबईला रवाना झाला होता. पण त्याने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर सोमवारी आपली पहिली प्रतिक्रिया ट्विटरवरुन दिली.


सलमानने ट्वीटमध्ये काय लिहिले.. 
सलमानने चाहत्यांचे आभार व्यक्त केले. 'कृतज्ञतेचे अश्रू... त्या सर्व लोकांचे आभार जे माझ्यासोबत होते आणि अजिबात आशा सोडली नाही. तुमच्याकडून मिळणारे प्रेम आणि पाठिंबा यासाठी खूप धन्यवाद' असे ट्वीट सलमानने केले आहे.


सलमानसाठी धाकटी बहीण झाली इमोशनल... 
तर सलमानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा हिनेदेखील तिच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. ‘माझी ताकद, माझा गर्व, माझा आनंद, माझं आयुष्य आणि माझं जग… तू जणून देवाचाच दूत आहेस. सर्व नकारात्मक शक्ती आणि इर्ष्या तुझ्या आयुष्यातून निघून जाव्यात आणि तुझ्या आयुष्यात फक्त आनंदाचाच शिडकाव व्हावा. येत्या काळात तुझी कामगिरी आणखी तेजस्वी होवो आणि तुला यश मिळो अशीच मी प्रार्थना करते", अशी भावनिक पोस्ट अर्पिताने लिहिली. 


नेमके प्रकरण काय आहे?
काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचे आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाची शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला. यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत.


पुढे वाचा, कशी गेली सलमानची तुरुंगातील रात्र?

बातम्या आणखी आहेत...