आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर कपूरला 'संजू' बनवले विग डिझायनर सुरेंद्र-जितेंद्र साळवींने, हिराणींना दाखवले होते 15-20 Looks

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - रणबीर कपूरचा 'संजू' चित्रपट बॉक्सऑफिसवर धूम करतोय. चित्रपटाचे 500 कोटींचा आकडा ओलांडलाय. चित्रपटातील रणबीरच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. दुसरीकडे रणबीर कपूरच्या लूक्सचीदेखिल चर्चा आहे. हे लूक्स डिझाइन करण्यात सुरेंद्र-जितेंद्र साळवींचा हात आहे. ते विग डिझायनिंगसाठी प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत या दोघांनी 400 हून अधिक चित्रपटात विग डिझाइन केले आहेत. 


- सुरेंद्र-जितेंद्र साळवी यांनी संजूमध्ये फक्त रणबीरच नव्हे तर परेश रावल, सोनम कपूर, अनुष्का शर्मा यांचेही विग डिझाइन केले आहे. त्याशिवाय सुरेंद्र आणि जितेंद्र साळवी यांनी 'कुली', 'खुदा गवाह', 'बाजीराव-मस्तानी', '3 इडियट्स', 'अग्निपथ', 'बाहुबली', 'पद्मावत', '102 नॉट आऊट' या चित्रपटांशीही बिग डिझाइन केले आहे. 

- बॉलिवूड में सुरेंद्र गेल्या 38 वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांचा भाऊ जितेंद्र 16 वर्षांपूर्वी या क्षेत्रात आला. त्यांच्या कंपनीचे नाव नॅचरल हेअर आहे. 
- सुरेंद्र साळवी यांनी सांगितले की, मी आजपर्यंत अनेक विग डिझाइन केले. पण संजय दत्तसाठी विग डिझाइन करणे हे चॅलेंज होते. मी सुनील दत्त आणि संजय दत्त दोघांबरोबर काम केले आहे. त्यामुळे मला त्यांच्या केसांच्या ठेवणीबाबत माहिती होती. आम्ही रणबीरसाठी 15 ते 20 लूक्स ट्राय केले होते. त्यापैकी आठ लुक्स हिराणींनी फायनल केले होते. 
- जितेंद्रने सांगितले की, एक दिवस संजय दत्त स्वतः सेटवर आले होते. ते रणबीरला पाहून म्हणाले मला आरसा पाहत असल्यासारखे वाटतेय, आमच्यासाठी तीच मोठी पावती होती. 

बातम्या आणखी आहेत...