आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिमला - हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्रीपदावर विजयी उमेदवारांपैकीच एका जणाला संधी देण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या नेतृत्वाने मंडी येथील आमदार जयराम ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. जयराम ठाकूर यांचे नाव समोर आल्याने धूमल समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. शुक्रवारीही निरीक्षक निर्मला सीतारमण आणि नरेंद्र सिंह तोमर यांच्यासमोर धूमल समर्थकांनी गोंधळ घातला. हिमाचल प्रदेशात भाजपला 44 तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या आहेत.
2 दिवसांपासून हिमाचलमध्ये आहेत निरीक्षक
- निरीक्षक निर्मला सीतारण आणि नरेंद्रसिंह तोमर गुरुवारी शिमला येथे पोहोचले. त्यांनी भाजप आमदार आणि नेत्यांची मते जाणून घेतली.
- सोर्सेसच्या माहितीनुसार शुक्रवारीही निरीक्षक कोअर कमिटीच्या बैठकीसाठी पोहोचले, पण धूमल समर्थकांनी येथेही गोंधळ घालायला सुरुवात केली.
कोण आहेत जयराम ठाकूर ?
जयराम ठाकूर पाचव्यांदा मंडी येथील सिराज मतदारसंघातून निवडून आले आहेत. ठाकूर 1998 मध्ये सर्वात आधी आमदार बनले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मधून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ठाकूर मंडीच्या राजकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांचा संबंध ABVP शी आला. बीए केल्यानंतर ते जम्मूमध्ये पूर्णवेळ ABVP चे काम करू लागले. दहा वर्षांनी 90 च्या दशकात त्यांना मंडीच्या सिराज विधानसभा मतदारसंघाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष बनवण्यात आले. त्यानंतर 1993 मध्ये ते युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षही बनले.
धूमल यांच्यासाठी जागा सोडण्याची तयारी अन विरोधही
- धूमल यांच्यासाठी पक्षाच्या तीन आमदारांनी तर जागा सोडण्याची तयारीही दाखवली आहे.
- न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी तसेच कांगडा येथील खासदारांनीही धूमल यांना मुख्यमंत्री बनवण्यास विरोध केला आहे.
- या सर्वांचे म्हणणे आहे की, पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. राज्यात असे अनेक नेते आहेत जे मुख्यमंत्री बनू शकतात. त्यामुळे पराभूत झालेल्या नेत्याला मुख्यमंत्री बनवले तर चुकीचा संदेश जाऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.