आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लपवणे दूरच, आता तर सार्वजनिक मंचावर कलावंत स्वत: देताहेत आजाराची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी नेटवर्क-  एकेकाळी चित्रपट कलावंत आपले आजार गोपनीय ठेवत असत. डॉक्टरच्या माध्यमातूनही ही बातमी बाहेर येऊ नये, असाच प्रयत्न असायचा. पण आता खुलेपणा येत आहे. लपवणे दूरच, कलावंत सार्वजनिक मंचावर आपल्या आजाराबाबत सांगत आहेत. इरफान खाननेही अलीकडेच असे केले आहे. याआधी कोणी असे केले आहे याबाबत...

 

सलमान खानने मुलाखतीत सांगितले होते, मला सर्वात वेदनादायक आजार
२०११ मध्ये सलमान खानने मुलाखतीत सांगितले होते की, मला सात वर्षांपासून ट्रायजेमिनल न्यूरॉलजिया आहे. चेहऱ्याच्या नसांत वेदना होणारा हा आजार सर्वात वेदनादायक आजारांपैकी एक आहे. त्याने म्हटले की, आता जास्त वेदना होत आहेत. मी त्या संपवणार आहे.

 

हृतिक रोशन याने मेंदूवरील शस्त्रक्रियेआधी फेसबुकवर स्वत:च दिली होती माहिती
७ जुलै २०१३ ला हृतिक रोशनने आपल्या फेसबुक पेजवर लिहिले- ‘आज माझी मेंदूची शस्त्रक्रिया होत आहे. त्यातून बरे होण्याची  शक्ती माझ्यात आहे.’ शूटिंगदरम्यान जखमी झाल्याने हृतिकच्या मेंदूत रक्ताची गाठ झाली होती.

 

अँजेलिना जोलीने लेख लिहून दिली होती ब्रेस्ट कॅन्सरची माहिती

२०१३ मध्ये न्यूयॉर्क टाइम्समध्ये लेख लिहून सांगितले की, आनुवंशिक कारणांमुळे मला ब्रेस्ट कॅन्सरचा ८७% तर ओव्हरिन कॅन्सरचा ५०% धोका आहे. मी प्रिव्हेंटिव्ह मॅक्सटेक्टमी सर्जरी केली आहे. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका आता फक्त ५% राहिला आहे.

बातम्या आणखी आहेत...