आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखिलाडी अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला 'पॅडमॅन' चित्रपट रिलीज झाला आहे. महिलांचे आरोग्यमान सुधारावे मासिक पाळीच्या दिवसांत त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अरुणाचलम मुरुगनंथम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षयसोबत राधिका आपटे, सोनम कपूर मेन लीडमध्ये आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक आर बाल्की यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. आर. बाल्की यांच्या पत्नी गौरी शिंदे आणि ट्विंकल खन्ना यांची निर्मिती आहे.
अरुणाचलम मुरुगनंथम स्वतः वापरत होते सॅनिटरी पॅड्स...
अनेक महिला परवडत नाही म्हणून मासिक पाळीमध्ये वापरले जाणारे सॅनिटरी पॅड वापरत नाहीत. त्यामुळे स्वस्तातील पॅड तयार करण्यासाठी मुरगा यांनी जंग जंग पछाडले. प्रोडक्ट कोणाला वापरायला द्यायचे याचा विचार करून करून अखेर त्यांनी स्वतःवर त्याची ट्रायल घेतली. त्यासाठीही त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले. लोक विकृत म्हणू लागले घटस्फोटापर्यंत गोष्ट केली. पण मुरुगा यांनी माघार घेतली नाही. आज 17 देशांमध्ये त्यांनी तयार केलेले मशीन इंपोर्ट केल्या जातात. चला तर मग जाणून घेऊयात मुरुगा यांचा संघर्ष.
पुढील स्लाइड्सवर वाचा मुरुगा यांनी सांगितलेली संघर्ष गाथा.. अखेरच्या स्लाइडवर पाहा व्हिडीओ..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.