आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • आलिया भट, आलिया भट, राझी, Alia Bhatt Upcoming Movie Raazi Dialogues

'तुम हिंदुस्तान की आँख-कान बनकर पाकिस्तान में रहो', हे आहेत 'राझी'चे डायलॉग्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री आलिया भटच्या आगामी 'राझी' या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला आहे. या चित्रपटात आलियाने  'सहमत' नावाच्या काश्मिरी तरुणीची भूमिका साकारली आहे. हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर 'राझी' चित्रपटाचे कथानक बेतलेले असून ही कथा सत्य घटनेवर आधारीत आहे. 

 

1971 मध्ये भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या वातावरणात सहमत पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न करते. भारतातून पाकिस्तानात आलिया सून म्हणून जाते, पण तिचा मुळ उद्देश पाकिस्तानात जाऊन गुप्तहेरी करणे असतो. चित्रपटात आलियाच्या नव-याची भूमिका अभिनेता विक्की कौशलने साकारली आहे. चित्रपटातील संवाद दमदार आहेत. 


- ‘फिलहाल’ आणि ‘तलवार’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या मेघना गुलझार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 
- ‘जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शन्सने चित्रपटाच्या निर्मिती धुरा सांभाळली आहे. 
- आलिया भट आणि विक्की कौशल यांच्यासह अमृता खानविलकर आणि सोनी राजदान यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
- येत्या 11 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.


पुढील स्लाईड्सवर वाचा, 'राझी' चित्रपटातील डायलॉग्स...  

बातम्या आणखी आहेत...