आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींचा मृत्यू संशयास्पद नसल्याचे स्पष्ट, पार्थिव रवाना, रात्री 10.30 ला पोहोचणार, उद्या अंत्यसंस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अखेर श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी कपूर कुटुंबीयांना सरकारी वकिलांकडून एनओसी मिळाले आहे. शवपेटी (Embalming) प्रक्रिया पूर्ण झाली असून श्रीदेवी यांचे पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आले आहे. आज रात्रीपर्यंत नऊ वाजेपर्यंत कपूर कुटुंबीय श्रीदेवी यांचे पार्थिव घेऊन मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू संशयास्पद नसल्याचे  सांगून दुबईच्या सरकारी वकिलांकडून आता ही केस बंद करण्यात आली आहे. आता खासगी विमानाने पार्थिव रात्री साडे नऊच्या सुमारास  मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईत ग्रीन एकर्स येथे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून उद्या सकाळी 11 च्या सुमारास अंत्यविधी केला जाणार आहे. 

 

बोनी कपूर यांना क्लीनचीट 

पुढील तपासासाठी बोनी कपूर यांना दुबईतच थांबावे लागणार असल्याचे वृत्त होते. पण आता त्यांना क्लीनचीट मिळाली आहे. बोनी कपूर यांचे पासपोर्ट दुबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त होते. पण श्रीदेवी यांचा मृत्यू संशयास्पद नसल्याचे चौकशीअंती समोर  आले आहे.

 

तीन दिवसांपूर्वी झाले निधन... 

श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारीच्या रात्री निधन झाले. त्यांच्या मृत्यूला जवळपास तीन दिवस लोटल्यानंतरही तिचे पार्थिव भारतात कधी येणार याचीच वाट सगळे पाहत होते. अखेर आज दुपारी  त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. दुबईतील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच श्रीदेवीचे पार्थिव भारतात आणण्यास मंजुरी मिळणार होती. सरकारी वकील या प्रकरणाची चौकशी करत होते. त्यांना गरज वाटली तर, श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे पुन्हा एकदा पोस्ट मॉर्टमही केले जाण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात आली होती. 

 

काय म्हणाल्या होत्या कायदे तज्ज्ञ... 
खलीज टाइम्सने कायदे तज्ज्ञ अनुराधा यांच्या हवाल्याने सांगितले की, नैसर्गिक किंवा अनैसर्गिक परिस्थितीमध्ये झालेल्या सर्व मृत्यू प्रकरणांमध्ये पोलिस संपूर्ण चौकशीनंतरच पार्थिव नेण्यासाठी परवानगी देत असतात. अनुराधा यांच्या मते जर पब्लिक प्रॉसिक्युशनला गरज वाटली तर ते श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे पुन्हा एकदा पोस्ट मॉर्टम करण्याचा निर्णयही घेऊ शकतात. 


बोनी कपूर यांची चौकशी?
अखेरच्या क्षणी श्रीदेवीसोबत काय झाले होते, याबाबत दुबई पोलिसांनी बोनी कपूर यांच्याकडे तब्बल चार तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या जबाबाचे शूटिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार बोनी कपूर यांची सोमवारी चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे माध्यमांमध्येही याबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, बोनी कपूर यांना दुबई सोडण्यास मनाई करण्यात आली असल्याचीही माहिती आहे. दुबई पोलिसांनी बोनी कपूर यांचा जबाब नोंदवला आहे.  


शनिवारी रात्री दुबईतील हॉटेलमध्ये काय झाले?
- कपूर कुटुंबाच्या एका निकटवर्तीयाच्या हवाल्याने खलीज टाइम्सने म्हटले आहे, की बोनी कपूर लग्न सोहळ्यात सहभागी होऊन मुंबईला परतले होते. 24 फेब्रुवारीला ते पुन्हा दुबईत आले. सायंकाळी साधारण 5.30 वाजता जुमैरा एमिरेट्स टॉवर हॉटेलमध्ये ते पोहोचले. येथेच श्रीदेवी थांबलेल्या होत्या. बोनी हे श्रीदेवी यांना सरप्राइज डीनरला घेऊन जाणार होते. 
- बोनी आणि श्रीदेवी यांना उठवले. दोघांमध्ये 15 मिनीट बोलणे झाले. त्यानंतर श्रीदेवी वॉशरुममध्ये गेल्या. जेव्हा 15 मिनिट होऊनही श्रीदेवी बाहेर आल्यानाही तेव्हा बोनी यांनी बाथरुमचे दार वाजवले तर आतून रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यांनी धक्का देऊन दार उघडले तर आतमध्ये श्रीदेवी बेशुद्ध आवस्थेत बाथटबमध्ये पडलेल्या होत्या. 
- बोनी यांनी त्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आपल्या मित्राला फोन केला. साधारण 9 वाजता पोलिसांना माहिती देण्यात आली. 
- पोलिस आणि डॉक्टर हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी श्रीदेवी यांना मृत घोषित केले.


मुंबईत अंत्ययात्रेची तयारी पूर्ण, पांढऱ्या रंगाच्या असतील सर्व वस्तू
- श्रीदेवी यांचे पार्थिव अद्याप भारतात आलेले नाही. मुंबईत अंत्ययात्रेची तयारी सुरु आहे. 
- श्रीदेवी यांना पांढरा रंग खूप आवडत होता. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह, काही निकटवर्तीयांना सांगून ठेवले होते की माझ्या अखेरच्या क्षणी सर्व वस्तू या पांढऱ्या राहातील. त्यामुळेच अंत्ययात्रेची तयारी सुरु असताना सर्व वस्तू या पांढऱ्या रंगाच्या असतील याकडे लक्ष दिले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...