आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी एका खोलीत राहायचा रवि किशन, आता आहे 12 बेडरुमच्या या घराचा मालक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भोजपुरी चित्रपटातील अमिताभ बच्चन म्हटला जाणारा रवि किशन मुंबई गोरेगावच्या एका बिल्डिंगमधील 14 व्या फ्लोरवर राहतो. रविने दोन डुप्लेक्स मिळवून घर बनवलेय. हे 8 हजार वर्गफूट आहे. या घरात 12 बेडरुम, डबल हाइटचे छत असलेले टेरेस आणि एक जिमसोबतच बरेच काही आहे. मुळ जौनपुर, उत्तर प्रदेशात राहणा-या रविला मुंबईत आपले घर बनवण्यासाठी खुप मेहनत करावी लागली.


एकेकाळी चाळीतील लहान खोलीत राहायचा रवि...
- divyamarathi.com शी खास बातचीत करताना रविने सांगितले की, इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी खुप मेहनत केली आहे. मला मुंबईतील माझे सुरुवातीचे दिवस आठवतात. मी तेव्हा एका चाळीत 120 वर्गफुटाच्या खोलीत राहायचो. ती रुम मी माझ्या 12 मित्रांसोबत शेअर करायचो. आज माझ्या एकट्याकडे 12 रुम आहेत.


घरात झाडंही आहेत
- रविच्या या घराच्या टेरेसवर अनेक झाडं आहेत. हे पाहून एका सुंदर बाग असल्याचे भासते.
- रवि सांगतो की, "आम्ही येथे चीकू आणि मिर्ची लावतो. माझी पत्नी प्रीतिला हिरवळ खुप आवडते. यामुळे मी येथे सर्व झाडं लावले आहेत. मी कधीच विचार केला नव्हता की, काँक्रीटच्या या बिल्डिंगच्या 14 व्या मजल्यावर आम्ही ऑर्गेनिक फळ आणि भाज्या उगवू."

- रवि किशनला पाळीव प्राण्यांसोबत खेळायला आवडते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रवि किशनच्या मुंबई येथील घराचे काही इनसाइड फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...