आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल होतेय इरफान ब्रेन कॅन्सरची बातमी, सेलिब्रिटी म्हणताहेत अफवा पसरवू नका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या बातम्यांनुसार इरफान खानला ब्रेन कॅन्सर आहे आणि त्याला मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेय. परंतू इरफानच्या जवळचे असलेले आणि ट्रेड एनालिस्ट कोमल नाहटाने ही बातमी चुकीचे असे सांगितले आहे. नाहटानुसार "इरफान अस्वस्थ आहे. परंतू मीडियामध्ये तिच्या कंडीशनविषयी विविध बातम्या येत आहेत. तो हॉस्पिटलमध्ये दाखल झालाय ही बातमी चुकीची आहे. देवाच्या कृपने इरफान सध्या दिल्लीत आहे. हेच सत्य आहे."


मीडियामध्ये काय सुरु आहे?
- मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जातेय की, इरफानला Glioblastoma Multiforme (GBM) ग्रेड 4 आहे. असेही म्हटले जात होते की, इरफानला गार्ट अटॅक आला होता आणि त्याला बोलताना त्रास होतोय. यानंतर त्याला मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.
- काही रिपोर्ट्सने असा दावा केलाय की, हा आजार दूर करण्यासाठी ऑपरेशन करणे हाच एक मार्ग आहे. परंतू इरफान यासाठी तयार नाही. काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे की, इरफानला कीमो थेरेपी दिली जाईल. याचा निर्णय बयोपेसी रिपोर्ट आल्यानंतर केला जाईल.


इरफान म्हणाला होता - अफवा पसरवू नका
- सोमवारी इरफानने एक ट्वीट करुन फॅन्स आणि माध्यमांना अफवा न पसरवण्याच अवाहन केलं होती. 
- इरफानने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, " कधी-कधी आयुष्य आपल्याला खुप मोठा धक्का देऊन जागे करते. गेल्या 15 दिवसांपासून माझे आयुष्य एका सस्पेंसप्रमाणे चालतेय. मला कधीच असे वाटले नव्हते की, मी ज्या रेयर कथेंमागे पळत असतो, तसाच रेयर आजारापर्यंत मी पोहोचले."
-"मी कधीच हार मानली नाही. मी नेहमी आपल्या आवडीसाठी लढत असतो आणि असेच करेल. माझे कुटूंब आणि माझे मित्र माझ्यासोबत आहेत. आम्ही यापासून चांगल्याप्रकारे प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत तुम्ही काहीच अंदाज लावू नका. पुढच्या 10 दिवसात सर्व रिपोर्ट्स येतील तेव्हा मी स्वतः तुम्हाला याविषयी सांगेल. तोपर्यंत माझ्यासाठी प्रार्थना करा."
- इरफान गेल्या 15 दिवसांपासून घरीच आराम करतोय. सुरुवातीला त्याला जॉन्डिस होता, परंतू आता इरफानने आपल्या या पोस्टने सर्वांना घाबरवले आहे. तो लवकरच 'ब्लॅकमेल' मध्ये दिसणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कोमल नाहटा आणि इरफान खानचे ट्वीट...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...