आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाचवेळी 104 सॅटेलाइट पाठवणारे सिवन ISRO चे नवे चेअरमन, दोन दिवसांनी 100वे लाँचिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रॉकेट स्पेशलिस्ट के.सिवन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) नवे चेअरमन असतील. भारताने विक्रमी 104 सॅटेलाइटचे यशस्वी लाँचिंग केले होते त्यात के.सिवन यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांची कामगिरी आणि त्यांच्या इस्त्रोतील योगदानामुळेच ते चेअरमन पदापर्यंत पोहोचले आहेत. विद्यमान चेअरमन ए.एस. किरण कुमार यांचा कालावधी 14 जानेवारीला संपुष्टात येत आहे. त्यांनी 12 जानेवारी 2015 मध्ये पदभार स्वीकारला होता.

 

100 वे सॅटेलाइट लाँचिंगच्या दोन दिवस आधी घोषणा 
- इस्त्रोच्या नवीन चेअरमनची घोषणा ही अशा वेळेस होत आहे जेव्हा इस्त्रो त्यांचे 100 वे सॅटेलाइट अंतराळात सोडणार आहे. या मिशनमध्ये एकूण 31 सॅटेलाइट सोडले जाणार असून त्यातील 28 दुसऱ्या देशांचे आहे. 

 

3 वर्षे राहाणार चेअरमन 
- पर्सनल मिनिस्ट्रीकडून जारी ऑर्डरनुसार, मिनिस्ट्रीच्या अपॉइंटमेंट कमिटीने स्पेस डिपार्टमेंटचे सेक्रेटरी आणि चेअरमन पदी सिवन यांच्या निवडीला मंजूरी दिली आहे. त्याचा कार्यकाळ 3 वर्षांसाठी असेल. 
- सिवन हे सध्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे डायरेक्टर आहेत. 

 

MITमधून ग्रॅज्यूएट 
- सिवन यांनी 1980 मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अॅरोनॉटिकल इंजिनिअरींगमध्ये ग्रॅज्यूएशन केले होते. 
- त्यानंतर 1982 मध्ये आयआयएससी बंगळुरु येथून एअरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये मास्टर डिग्री मिळवली होती. 
- 2006 मध्ये त्यांनी आयआयटी मुंबई येथून एअरोस्पस इंजिनिअरींगमध्ये डॉक्टरेट (पीएचडी) पूर्ण केले. 


1982 मध्ये जॉइन केले इस्त्रो 
- सिवन यांनी 1982 मध्ये इस्त्रोचा पोलर सॅटेलाइट लाँच व्हिकल (पीएसएलव्ही) प्रोजेक्ट जॉइन केला होता. त्यांनी एंड टू एंड मिशन प्लॅनिंग, मिशन डिझायनिंग, मिशन इंटिग्रेशन अँड अॅनेलिसिस यामध्ये मोठे योगदान दिले आहे.
- ते इंडियन नॅशनल अॅकेडमी ऑफ इंजिनिअरिंग, एअरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि सिस्टम्स सोसायटी ऑफ इंडिया मध्ये फेलो होते. त्यांनी अनेक जर्नलमध्ये पेपर लिहिले आहेत. 
- अनेक पुरस्कारांचे मानकरी राहिलेले सिवन यांना महत्त्वाचा डॉ. विक्रम साराभाई रिसर्च अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आलेले आहे. 

बातम्या आणखी आहेत...