आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ-जया बच्चन यांच्यावर 100 कोटींचे कर्ज; देश-विदेशाच्या 19 बँकांमध्ये आहे अकाउंट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- समाजवादी पक्षाकडून जया बच्चन यांना चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेसाठी एप्रिलमध्ये रिक्त होणार्‍या 10 जागांपैकी एका जागेसाठी जया बच्चन यांनी  शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. सध्या राज्यसभेच्या सदस्य असलेल्या जया बच्चन यांचा कार्यकाळ दोन एप्रिलला पूर्ण होत आहे.

 

बच्चन दांपत्य हे देशातील श्रीमंत लोकांपैकी एक आहे. परंतू खुप कमी लोकांना माहिती असेल की, त्यांच्यावर कोट्यावधींचे कर्ज आहे.

 

100 कोटींच्या कर्जात बुडाले आहे अमिताभ-जया...

- जया बच्चनच्या शपथ पत्रानुसार, त्यांच्या आणि अमिताभ बच्चनजवळ जवळपास 10.01 अरबपेक्षा जास्त स्थिर आणि अस्थिर संपत्ती आहे. जयाजवळ 26.10 कोटी आणि अमिताभजवळ 36.31 कोटीचे दागिने आहेत.

- तर जयाकडे 67,79,31,546 रुपयांची आणि अमिताभकडे 4,71,04,35,020 ची स्थिर संपत्ती असल्याचे सांगण्यात आलेय. शपथ पत्रात जयाच्या नावाची 1.30 अरब आणि अमिताभ यांच्या जवळ 3.32 अरब रुपयांची अस्थित संपत्तचा उल्लेख आहे.

- यामध्ये लखनऊ, बाराबंकी, भोपाळ, नोएडा, अहमदाबाद, पुणे, गांधीनगर, जूहू (मुंबई) च्या जमीनींचा उल्लेख आहे. दोघांवर कर्जही आहे. जयावर 87,34,62,085 तर अमिताभवर 18,28,20,951 रुपये क्रेडिट आहे. म्हणजेच या दाम्पत्यावर एकूण 100 कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे.


19 बँकांमध्ये बच्चन दाम्पत्याची खाती
- अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांचे लंडन, फ्रान्स, दुबई आणि पॅरिससोबत देश-विदेशातील 19 बँकांमध्ये अकाउंट आहे.
- यामध्ये चार बँक खाती जया बच्चन यांचे आहेत, यामध्ये 6.84 कोटी रुपये जमा आहेत. जयाचे फक्त एकच खाते देशातून बाहेर दुबईच्या एचएसबीसी बँकेत आहे. येथे सर्वात जास्त 6.59 कोटी रुपये जमा आहेत.
- बिग बींच्या 15 बँक खात्यात 47.47 कोटी रुपयांपेक्षा जास्त एफडी आणि पैसे आहेत. अमिताभ यांचे पैसे आणि एफडी मुंबई आणि दिल्लीच्या बँकेंसोबतच बँक ऑफ इंडियाच्या पॅरिस शाखा, बँक ऑफ इंडियाची लंडन शाखा आणि बीएनपी फ्रन्समध्ये आहे. हे स्वतः जया यांनी नामांकन पत्रासोबतच्या शपथपत्रात सांगितली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे Photos...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...