आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मामेबहिणीचे केले होते लैंगिक शोषण, आता 75 वर्षांच्या वयात जितेंद्रवर दाखल केला FIR

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जिंतेंद्र यांच्यावर लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही काळापुर्वी जितेंद्र यांच्यावर त्यांच्या मामेबहिणीने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यावर आता शिमल्यामध्ये त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलाय. पीडित महिलेने घटनेच्या तब्बल 47 वर्षांनंतर तक्रार दाखल केली. पीडितेने खुलासा केला की, ती 18 वर्षांची होती तेव्हा जितेंद्र 28 वर्षांचे होते. यावेळी जितेंद्र यांनी त्यांच्यासोबत वाईट कृत्य केले होते.


खूप घाबरली होती पीडिता...

सूत्रांनुसार, पीडिता 18 वर्षांची असताना जितेंद्र यांनी तिला शूटिंग दाखवण्यासाठी नेले होते. तिथे हे वाईट कृत्य केल्याचा दावा पीडितेने केला आहे. या घटनेनंतर ती खूप घाबरली होती. यामुळेच याबद्दल ती अनेक वर्षे काहीच रिअॅक्ट करु शकली नाही.

 

आता माझे आई-वडील या जगात नाहीत. त्यामुळे मी तक्रार नोंदवू शकले नाही. ही घटना ऐकूण त्यांना दुःख होऊ नये, याची मी काळजी घेतली. परंतु, सध्या सुरु असलेल्या #METOO या कँम्पेनमुळे मला ही हिम्मत आल्याचे पीडितेने सांगितले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जितेंद्र यांचे रेअर फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...