आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा सोशल मीडियावर आली मुलगी, लिहिले भावनिक पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवी (54) यांच्या मृत्यूनंतर त्यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर पहिल्यांदा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाली. तिने आपल्या फॅन्सच्या नावाने एक इमोशनल पोस्ट केली. या पोस्टसोबत एक लेटर शेअर करत जान्हवीने लिहिले की, "मी माझ्या वाढदिवशी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की, तुम्ही तुमच्या पालकांवर प्रेम करा. त्यांना समजून घ्या आणि त्यांना तुमच्या प्रेमाची जाणिव करवून देण्यासाठी समर्पित व्हा."

 

माझ्या आईला प्रेमाने आठवणीत ठेवा
जान्हवीने आपल्या लेटरमध्ये लिहिले की, " मी तुम्हाला हेही सांगते की, तुम्ही माझ्या आईला प्रेमाणे आठवणीत ठेवा आणि तिच्या आत्मशांतिसाठी प्रार्थना करा. तिच्यावरचे प्रेम कायम ठेवा. माझ्या आईचा सर्वात मोठा भाग म्हणजे, ती 'पापा'सोबत शेअर करत असलेले प्रेम होते."
- "त्यांचे प्रेम अनमोल होते. कारण यासारखे जगात काहीच नाही. कोणीही त्या दोघांसारखे एकमेकांना समर्पित असू शकत नाही. कृपया सन्मान करा. कारण त्यांचे प्रेम मिटवण्याचा कुणी प्रयत्न करतेय हे विचार करुनही त्रास होतो."


- "ती माझी आई होती म्हणूनच तिची पवित्रता टिकवून ठेवा असे नाही. पण ती त्या व्यक्तीसाठी ठेवा, जो तिच्या आजुबाजूला फिरत राहायचा, तिच्या प्रेमाची निशानी म्हणून त्यांना दोन लेकरं आहेत. मी आणि खुशीने फक्त आई गमावली आहे. परंतू 'पापा'ने त्यांचा जीव गमावला आहे."
- "एक अभिनेत्री किंवा एक आई किंवा एक पत्नीपेक्षाही ती खुप काही होती. ती प्रत्येक भूमिकेत सर्वात चांगली होती. प्रेम देणे आणि प्रेम घेणे येवढेच तिच्यासाठी महत्त्वाचे होते. लोकांसाठी ती चांगली, शालीन आणि दयाळू होती. फ्रस्ट्रेशन, व्देष किंवा ईर्षा या तिला स्पर्शही करु शकल्या नाहीत."


- "तर असेच करा. फक्त प्रेम वाटत राहा. यामुळे तिला आनंद मिळेल की, मी मृत्यूनंतरही काहीतरी देऊन गेलेय. साहस आणि प्रेरणा तुम्हाला प्रेमाने भरुन टाकेल आणि आतील कटूता बाहेर पडेल. प्रतिष्ठा, ताकद आणि निरागसता या नेहमीच तिच्यात होत्या. "
- "तुम्ही गेल्या काही दिवसात जे प्रेम आणि आधार आम्हाला दिला त्यासाठी धन्यवाद, यामुळे आम्हाला ताकद आणि प्रेरणा आम्हाला मिळाली."

 

7 मार्चला 21 वर्षांची होईल जान्हवी
- जान्हवी कपूर 7 मार्चला 21 वर्षांची होईल. या निमितत्ताने सेलिब्रेशन होणार नाही.
- श्रीदेवी यांचे निधन 24 फेब्रुवारीला दुबईच्या एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून झाले होते. 28 फेब्रुवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा जान्हवीने लिहिलेले लेटर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...