आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे होते 'कोन बनेगा करोडपती' चे रजिस्ट्रेशन, जाणून घ्या पुर्ण प्रोसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेट डेस्क : 'कोन बनेगा करोडपती' चे पुढचे सीजन 2018 मध्ये सुरु होईल. या शोचे आतापर्यंत 8 सीजन ऑन-एयर झालेय. आता पुढच्या सीजनची तयार सुरु झाली आहे. शोचे रेजिस्ट्रेशन ऑगस्टमध्ये सुरु होईल आणि ऑक्टोबरमध्ये शो ऑन एयर होईल. शोमध्ये पार्टिसिपेशनसाठी रिजिस्ट्रेशन लाइन मार्चच्या शेवटपर्यंत ओपन होऊ शकते. यामध्ये तुम्ही एसएमएस, कॉल, मोबाइल अॅपच्या माध्यमातून भाग घेऊ शकता.


- गेल्या सीजनमध्ये लोक घरबसल्या शोमध्ये जियो अॅपच्या माध्यमातून सहभागी होऊ शकत होते. यावेळीही हे असेच राहू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पार्टिसिपेट करण्यासाठी काय करावे लागेल :

 

- जेव्हा रिजिस्ट्रेशन लाइन ओपन होते, सोनी टीव्ही याचा प्रोमो रिलीज करते.
- तुम्ही शोच्या ऑफिशिअल वेबसाइट  kbcliv.in वर स्वतःला रजिस्टर केले आहे तर तुम्हाला ऑनलाइन रजिस्टर करण्याची माहिती दिली जाईल.
- या शोमध्ये कोणीही भारतीय भाग घेऊ शकतो. तुम्ही ऑनलाइन रजिस्टर करुन केबीसी अॅपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशनसाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देऊ शकता. टीव्हीवर रजिस्टर करण्यासाठी वेळोवेळी प्रश्न विचारला जातो. एका प्रश्नासाठी लाइन 24 तास ओपन राहते.


- अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शोमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे लागले.
- तुमचे सिलेक्शन फर्स्ट राउंडमध्ये झाले तर तुम्हाला सोनी टीव्हीकडून फोन केला जातो आणि दूसरा प्रश्न विचारला जातो. तुम्ही याचेही योग्य उत्तर दिले तर तुम्हाला थर्ड राउंड म्हणजेच ऑडिशनसाठी बोलावले जाते. वेगवेगळ्या शहरांमध्ये ऑडिशन सेंटर बनवून लोकांना ऑडिशनसाठी बोलावले जाते.
- यावेळी एक फेस व्हिडिओ टेस्ट घेतली जाते. यामध्ये तुम्ही क्लिअर झालात तर तुम्हाला अमिताभ बच्चनसोबत ऑन एयर होणा-या एपिसोडच्या दहा प्रतिस्पर्ध्यांमध्ये निवडले जाते. येथे तुम्ही फास्टेस्ट फिंग फर्स्टमध्ये जलद उत्तर दिले तर तुम्हाला बिग बीसोबत हॉट सीटवर बसण्याची संधी मिळते.