आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर्त तुरुंंगाच्या नव्हे, लग्नाच्या बेडीत अडकला मिमोह, बलात्काराच्या आरोपांनंतर सध्या जामिनावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चहुबाजूंनी विरोधानंतरही रेपचा आरोपी मिमोह चक्रवर्तीचे लग्न आज (मंगळवार) झाले आहे. मिमोहच्या वकील प्रियंका कृपाशंकर दुबे यांनी मंगळवारी सकाळी लग्न होणार असल्याची  माहिती दिली होती. अॅड. प्रियंका म्हणाल्या, ‘लग्नाची तारीख सोमवारी रात्री ठरवण्यात आली. सर्वांनी विचार केला की, जर हॉटेलमध्ये लग्नाची तयारी झालेली आहेच, तर शुभकार्यासाठी उशीर होऊ नये. म्हणूनच आजचा दिवस निवडण्यात आला. आज (मंगळवार) हिंदू रीति-रिवाजांनी लग्न पार पडणार आहे. तत्पूर्वी शनिवारीच कोर्टात जाऊन दोघांनीही कोर्ट मॅरेज केले होते.’

 

पीडितेचे वकील म्हणाले, ती सुसाइड करण्याची भीती
दुसरीकडे पीड़ितेचे वकील नीरज गुप्ता म्हणाले की, ते आज (मंगळवार) दिल्ली हायकोर्टात मिमोहला मिळालेल्या जामिनाला आव्हान देणार आहेत.
- नीरज म्हणाले, ‘मिमोहचे कुटुंब पॉवरफुल आहे. रोहिणी कोर्टाने कोणत्या बेसिसवर त्याला जामीन दिला आहे, हे समजण्याच्या पलीकडे आहे. सध्या त्या प्रकरणाचा तपास सुरूही झालेली नाही आणि मिमोहला शनिवारी संध्याकाळी जामीन देण्यात आला. त्याच सकाळी ही केस बेगमपूर पोलिस स्टेशनमधून दिल्ली क्राइम ब्रँचला ट्रान्सफर झाली होती.
- राहता राहिला रेपनंतर लगेच केस फाइल न करण्याचा, तर याचे कारण मिमोहने दाखवलेले आमिष होते. तो त्यानंतर माझ्या अशिलाला फसवत राहिला की, करिअर सेट झाल्यावर लग्न करू.

- गतवर्षी तर त्याने माझ्या क्लायंटसोबत आपली कुंडलीही बनवली होती. अचानक आता हे सर्व घडत आहे. माझी क्लायंट डिप्रेशनमध्ये आहे. मी तिचे समुपदेशन करत आहे. तिची एकूण परिस्थिती पाहता ती आत्महत्या करण्याची भीती वाटते.’

 

काय होते प्रकरण
भोजपुरी चित्रपटांतील अॅक्ट्रेसच्या अर्जावरून दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने सोमवारी मिमोहवर बलात्कार, गर्भपात करणे आणि फसवणूक, तसेच त्याची आई योगिता बालीविरुद्ध धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला होता. शनिवारी दिल्लीच्या कोर्टातून दोन्ही आरोपींना अग्रीम जामीन देण्यात आला होता.

 

अॅक्ट्रेसशी लग्न करत आहे मिमोह
मिमोह म्हणजेच महाक्षय चक्रवर्ती डायरेक्टर आणि प्रोड्यूसर सुभाष शर्मा यांची कन्या तथा अॅक्ट्रेस मदालसाशी लग्न करत आहे. मदालसाने 2009 मध्ये तेलुगु चित्रपट 'फिटिंग'मधून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. याशिवाय तिने कन्नड़ चित्रपट 'शौर्य'मध्येही काम केले आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...     

 

 

बातम्या आणखी आहेत...