आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेसमन मुलाच्या आयुष्यावर बनला आहे चित्रपट, आई अजुनही धुते लग्नामध्ये भांडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडवा/मुंबई : हॉलिवूडचा 'लॉयन' चित्रपट ऑस्करसाठी नॉमिनेट झाला होता. या चित्रपटाची कथा एका अशा व्यक्तीवर होती, ज्याची आई आजही लग्नात किंवा इतर कार्यक्रमांमध्ये भांडी घासण्याचे काम करते. आम्ही इंडो-ऑक्ट्रेलियन बिझनेसमन आणि ऑथर सारु ब्रिएर्लीविषयी बोलत आहोत. तो पाच वर्षांचा असताना 1987 मध्ये आईपासून वेगळा झाला होता. सारुला एका ऑस्ट्रेलियन दाम्पत्याने दत्तक घेतले आणि याच्या 25 वर्षांनंतर तो त्याच्या ख-या आईला भेटला होता.

 

आईपासून ताटातुट होण्याची अशी आहे कथा
- देव पटेल आणि निकोल किडमन स्टारर 'लॉयन' चित्रपटात सारुच्या रियल लाइफवर फोकस केलेय. देवने चित्रपटात सारु आणि निकोलने त्याच्या अडप्टेड आईची भूमिका साकारली आहे.
- सारुची कथा अशी आहे की, 5 वर्षाचा असताना सारु आपला मोठा भाऊ गुड्डूला शोधण्यासाठी निघाला होता. गुड्डू हा खंडवाबासून जवळापास 70 किमी अंतरावर बुरहानपुर स्टेशनवर ट्रेनची स्वच्छता करायचा आणि पैसा गोळा करायचा.
- भावाला शोधत असतानाच एक ट्रेन सारुला कोलकात्याला घेऊन जाते आणि त्याला अनाथलयात सोडून देते.
- या अनाथालयातून त्याला एक ऑस्ट्रेलियन कपल दत्त घेते. इकडे आई फातिमा मुंशी अनेक दिवस आपल्या सारुला शोधत असते. परंतू ती मुलगा काही सापडत नाही.

 

2012 मध्ये अशा प्रकारे कुटूंबापर्यंत पोहोचला सारु
- 2012 मध्ये सारुने फेसबुक खंडवा नावाच्या पेजवर संपर्क केला. यावरुन त्यांना समजले की, त्यांची फॅमिली याच शहराच्या गणेश तलाई भागात राहते. कारणे फातिमा या आपल्या मुलाला शोधत असल्यामुळे प्रसिध्द झाल्या होत्या. यामुळे पेजवर सारु यांना त्यांच्या आईविषयीची माहिती सहज मिळाली.
- ज्यावेळी या 60 वर्षीय महिलेला तिचा मुलगा भेटला तेव्हा ती खुप इमोशनल झाली. यांनंतर मुलाने आईला आर्थिक मदत केली. परंतू आईच्या लाइफस्टाइलमध्ये बदल झाले नाही. फातिमाचे शेजारी सांगतात की, मुलगा पैसे पाठवत असूनही फातिमा लग्न आणि दूस-यांच्या कार्यक्रमांमध्ये भांडे घासण्याचे काम करतात.


काय सांगतात फातिमा
- 2017 मध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये फातिमाने सांगितले की, 2012 मध्ये भेटल्यानंतर मुलाने सुरुवातीला पैसे पाठवले. परंतू आता पैसे पाठवणे बंद केलेय.
- फातिमा म्हणाल्या होत्या की, मी माझ्या मुलाच्या यशामुळे खुप खुश आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा त्यांचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...