आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातीच्या हत्येचा धक्का पचवू शकली नाही आजी, 58 दिवसांनी तिनेही त्यागले प्राण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - फरहान अख्तर ची Ex-वाइफ अधुना अख्तरची सलून चेन 'बी ब्लंट'ची फायनान्स मॅनेजर कीर्ती व्यासच्या हत्येचे प्रकरण चांगलेच गाजले. कीर्तीची आजी नातीच्या अचानक मृत्यूचा धक्का सहन करू शकली नाही आणि तिचेही निधन झाल्याची बातमी येत आहे. रिपोर्ट्सनुसार अखेरच्या काळात किर्तीचा फोटो आजीच्या जवळ होता. रविवारी कीर्तीच्या आजीचे निधन झाले. पण कीर्तीने याबाबत मीडियाला आता माहिती दिली आहे. 


16 मार्चपासून बोलत नव्हत्या.. 
16 मार्चला कीर्ती अचानक बेपत्ता झाली होती. तोपर्यंत तिच्या आजीची तब्येत ठिक होती. कीर्तीच्या भावाने एका वेबसाईटशी बोलताना सांगितले की, कीर्ती घरात दिसली नाही तेव्हा आजीने त्यांना वारंवार तिच्याबाबत विचारले. आम्ही अनेकदा विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पण आजी तिच्याबाबत वारंवार विचारत होती. आजीचे तिच्यावर प्रचंड प्रेम होते. तिच्याजवळ कायम कीर्तीचा एक फोटो असायचा. 16 मार्चपासून त्यांना शांत झाल्या आणि हळू हळू त्यांची तब्येत ढासळत गेली. 


अचानक पडल्या आणि उठल्याच नाही 
कीर्तीच्या भावाने सांगितले की, रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्या विचित्र प्रकारे खाली पडल्या होत्या. आम्ही हे पाहून डॉक्टरांना बोलावले. तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. 


 

बातम्या आणखी आहेत...