आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • विशाल भारद्वाज, Omkara Director Vishal Bhardwaj Mother Prayer Meet

विशाल भारद्वाज यांच्या आईला कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, शोकसभेत पोहोचले हे कलाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'हैदर', '7 खून माफ', 'मटरू की बिजली का मनडोला', 'ओमकारा', 'रंगून'सह अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना 8 एप्रिल रोजी मातृशोक झाला. त्यांच्या मातोश्री सत्या भारद्वाज यांचे रविवारी आकस्मिक निधन झाले होते. बुधवारी मुंबईतील इस्कॉन मंदिरात त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावून सत्या भारद्वाज यांना श्रद्धांजली वाहिली. गीतकार गुलजार, रेखा भारद्वाज, सुरेश वाडेकर आणि त्यांच्या पत्नी, पीयूष मिश्रा, सुनील ग्रोवर, सान्या मल्होत्रा, गुरमीत चौधरी, सुनील सिन्हा, अमोल गुप्ते, हुमा कुरैशी, अमित बहलसह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. 


पुढील स्लाईड्सवर बघा, विशाल भारद्वाज यांच्या आईच्या प्रेअर मीटमध्ये पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...