आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळा मारणाऱ्या प्रियाने आता मार्क झुकेरबर्गलाही पछाडले, एवढे वाढले Followers

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियाने इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सचा विचार करता मार्क झुकेरबर्गलाही पछाडले आहे. - Divya Marathi
प्रियाने इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सचा विचार करता मार्क झुकेरबर्गलाही पछाडले आहे.

त्रिशूर (केरल) - केरळच्या त्रिशूरची राहणारी प्रिया प्रकाश वॉरियरची प्रसिद्धी एवढी अफाटपणे वाढत आहे की, तिने आता इन्स्टाग्रामच्या मालकालाच फॉलोअर्समध्ये मागे टाकले आहे. या फोटो शेअरिंग App चा मालक मार्क झुकेरबर्ग जवळपास साडे 7 वर्षांपासून इन्स्टाग्रामवर आहे. सध्या त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या 4 मिलियन आहे. तर प्रियाच्या फॉलोअर्सची संख्या आता 4.5 मिलियनवर गेली आहे. तेही अवघ्या दीड वर्षात. 


जगातील 105 देशांची लोकसंख्याही यापेक्षा कमी 
- प्रियाच्या फॉलोअर्सची संख्या गेल्या एका आठवड्यात प्रचंड वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे व्हॅलेंटाइन डेला व्हायरल झालेला तिचा डोळा मारण्याचा व्हिडिओ. 
- तुलनाच करायची झाली तर इन्स्टाग्रामवर प्रियाचे जेवढे फॉलोअर्स आहेत तेवढी जगातील 105 देशांची लोकसंख्याही नाही. जगातील 233 पैकी 105 देश असे आहेत, ज्यांची लोकसंख्या सुमारे 801 ते 45 लाखांदरम्यान आहे. 

 

प्रिया Vs झुकेरबर्ग
- प्रिया प्रकाशने दीड वर्षात इन्स्टाग्रामवर 91 पोस्ट केल्या आहेत. तर झुकेरबर्गने साडे 7 वर्षांत 120 पोस्ट केल्या आहेत. 
- प्रिया इन्स्टाग्रामवर 86 जणांना फॉलो करते. तर झुकेरबर्ग 401 जणांना फॉलो करतो. 
- पोस्टचा विचार करता प्रिया चित्रपट किंवा फोटोशूटशी संबंधित पोस्ट करते. तर झुकेरबर्ग शक्यतो फॅमिली मेंबर्स आणि मित्रांबरोबरचे जास्तीत जास्त फोटो शेअर करत असतो. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रिया आणि झुकेरबर्गच्या पहिल्या आणि शेवटच्या पोस्ट्स.. 

बातम्या आणखी आहेत...