आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोलच्या ऑनस्क्रीन भावी पतीची अशी झाली अवस्था, अॅक्टिंगसोडून करतोय हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'प्या तो होना ही था'(1998) मध्ये काजोलच्या होणा-या पतीची भूमिका साकारणारा अभिनेता बिजय आनंदचा लूक आता पुर्णपणे बदलला आहे. त्याला ओळखणेही कठीण झालेय. बिजयने नुकतेच सोशल मीडयावर काही फोटोज शेअर केलेय. यामध्ये तो ओळखूही येत नाहीये. 'प्यार तो हाना ही था' नंतर विजयने अॅक्टिंगमधून सन्यास घेतला होता. परंतू 2015 मध्ये तो 'सिया के काम' या टीव्ही मालिकेत जनक राजाच्या भूमिकेत दिसला होता. मधल्या काळाती 17 वर्ष त्याने कुंडलिनी योग शिकण्यात आणि दूस-यांना शिकवण्यात घालवले. 


'प्यार तो हाना ही था' नंतर ऑफर झाले 22 चित्रपट
- बिजयने एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटात स्थान मिळवण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला. परंतू जेव्हा 'प्यार तो होना ही था' चित्रपट हिट ठरला. तेव्हा त्याला एकाच वेळी 22 चित्रपटांची ऑफर मिळाली.
- परंतू तोपर्यंत बिजयने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. बिजय सांगतात की, "मी गरीबी आणि संघर्ष सर्वच पाहिले आहे. मला नेहमीपासूनच अॅक्टर बनायचे होते. परंतू मला नंतर जाणवले की, याला काही अर्थ नाही."
- बिजयने सांगितल्याप्रमाणे, ज्यावेळी त्यांनी योग कॉन्फ्रेंसमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना जाणिव झाली की, चित्रपटात काम करुन काही अर्थ नाही. तो सांगतो की, " माझी बॉडी स्टिफ होती. मला वाटले की, योग याला फ्लेक्सिबल करण्यात माझी मदत करेल. वयाच्या 36 व्या वर्षी मला संधीवात झाला. कोलेस्ट्रॉल हाय झाले. तेव्हा मला कुंडलिनी योगाविषयी माहिती मिळाली. जर तुमचा आत्मा खुश नसेल तर शरीरात आजार निर्माण होतात."


या चित्रपट आणि सीरियल्समध्ये बिजयने केले काम
- बिजयने आपल्या करिअरची सुरुवात छोड्या पडद्यावरुन केली होती. त्याने  'आसमान से आगे' (1994), 'ख़ुशी' (1995), 'औरत' (2001) आणि 'सिया के राम' (2015-16) सारक्या सीरियल्समध्ये काम केले.
- यासोबतच बिजय 'यश' (1996) आणि 'प्यार तो होना ही था' (1998) सारख्या चित्रपटात दिसला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बिजय आनंदचे काही लेटेस्ट फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...