आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानला सपोर्ट केल्याने अडचणीत आली ही अॅक्ट्रेस, बिष्णोई समाजाकडून जीवे मारण्याची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'हम साथ साथ है' या चित्रपटात सलमान खानच्या आई (रिमा लागू) च्या मैत्रिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कुनिका सदानंद लाल हिला बिष्णोई समाजातील काही लोकांनी जीवे मारण्याची धमकी आणि अश्लिल मेसेज पाठवल्याचे समोर आले आहे. 

 

काळवीट शिकार प्रकरणात सलमानच्या शिक्षेवरील सुनावणीदरम्यान कनिका काही वृत्तवाहिन्यांच्या चर्चांमध्ये सहभागी झाली होती. बिष्णोई समाजाने सलमानच्या जामिनाला विरोध न करता त्याला वेगळ्या प्रकारची शिक्षा देऊन लोकांसमोर उदाहरण सादर करावं असं मतं तिने या चर्चांदरम्यान मांडलं होतं. त्याचप्रमाणे तिने बिष्णोई समाजावर टीका केली होती. यानंतर लगेच तिला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्याचं तिने म्हटले.

 

कनिकाने त्या सर्व फोन कॉल्स आणि मेसेजचे रेकॉर्ड पोलिसांना दिले असून याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर तिला पोलिसांकडून सुरक्षाही पुरवण्यात आली आहे. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.


माफी मागितल्यानंतरही येत आहेत धमकीचे फोन, वाचा पुढील स्लाईडवर... 

बातम्या आणखी आहेत...