आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान-कतरिना पोहोचले अनिल कपूरच्या घरी, बायकोसोबत दिसला अक्षय कुमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवी यांचे पार्थिव अखेर मुंबईमध्ये दाखल झालेय. प्रदिर्घ कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर दुबईमधून पार्थिव मंगळवारी रात्री मुंबईत आणण्यात आले. पती बोनी कपूर आणि पुत्र अर्जुन कपूर खासगी विमानाने पार्थिव घेऊन रात्री पावणेदहाच्या सुमारास मुंबईत आले. श्रीदेवींवर बुधवारी दुपारनंतर अंत्यसंस्कार केले जातील. सकाळी ९.३० ते १२.३० पर्यंत अंधेरी सेलिब्रेशन क्लबमध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. यावेळी कपूर कुटूंबियांचे सात्वंन करण्यासाठी अनेक कलाकार अनिल कपूर यांच्या घरी हजेरी लावत आहेत. रात्री सलमान खान, कतरिना कैफ, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सारा अली खान, अथिया शेट्टी, अनुपम खेर, सिकंदर शेक, शमी कपूर, रमेश सिप्पी यांसह अनेक कलाकार दिसले.

 

बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाह याच्या विवाहासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. 24 फेब्रुवारी रोजी हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. सुमारे अडीच दिवस चौकशीनंतर दुबई पोलिसांनी पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवले. औपचारिकता पूर्ण करून बोनी व अर्जुन कपूर सायंकाळी 7 वाजता दुबईतून निघाले होते. श्रीदेवी यांचे पार्थिव रात्री सुमारे साडेदहा वाजता त्यांच्या लोखंडवालास्थित निवासस्थानी आणले. ही माहिती मिळताच कपूर कुटुंबीयांचे आप्तेष्ट तसेच शेकडो चाहत्यांनी गर्दी केली.

 

मृत्यूबाबतच्या संशयाला पूर्णविराम

दुबईत श्रीदेवी यांच्या मृत्यूची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सरकारी वकिलांनी पोलिसांच्या अहवालाशी सहमती दर्शवली. बेशुद्ध होऊन पडल्याने बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे सरकारी वकिलांनी मान्य केले आणि याविषयीच्या संशयाला पूर्णविराम मिळाला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या कलाकारांचे फोटोज...
 

बातम्या आणखी आहेत...