आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्ट्रेस पायल रोहतगी-पहिलवान संग्राम नोव्हेंबरमध्ये करणार लग्न, 4 वर्षांपूर्वी केली होती Engagement

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अॅक्ट्रेस पायल रोहतगी तिचा पहिलवान बॉयफ्रेंड संग्राम सिंहबरोबर यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार आहे. 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करणार्या या दोघांनी 4 वर्षांपूर्वी 27 फेब्रुवारी 2014 रोजी साखरपुडा केला होता. संग्रामच्या मते, आधी आम्ही साखरपुड्यानंतर एका वर्षातच लग्न करणार होतो, पण कामात व्यस्त असल्याने ते शक्य झाले नाही. आता यावर्षी नोव्हेंबरमध्ये आम्ही लग्न करतोय. लग्नानंतर कुटुंब वाढवण्यास उशीर करणार नसल्याचेही संग्राम यावेळी म्हणाला. 


बोल्ड फोटोशूटमुळे आले चर्चेत 
- पायल तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. डिसेंबर 2014 मध्ये तिने संग्रामबरोबर बोल्ड फोटोशूट केले तेव्हा ते चांगलेच चर्चेत आले होते. 
- संग्राम आणि पायलची पहिली ओळख ‌रियालिटी शो 'सर्व्हायवर इंडिया' मध्ये झाली आणि त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. पायल आधी राहुल महाजनबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पण ते नाते फार काळ टिकले नाही. 
- पायल '36 चाइना टाऊन', 'हे बेबी', 'फिर जिंदगी' अशा चित्रपटांबरोबरच 'सर्व्हायवर इंडिया', 'नच बलिए 7' या टीव्ही रियलिटी शोजमध्येही झळकली आहे. पण ति प्रसिद्ध झाली 'बिग बॉस 2' नंतर. या शोमध्ये संभावनाबरोबर तिचे जोरदार भांडण झाले होते. 
- संग्रामनेही 'बिग बॉस 7', 'सर्व्हायवर इंडिया', 'सच का सामना', '100% दे दना दन' आणि 'राज पिछले जनम का' सारख्या रियालिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. 
- 2014 मध्ये संग्राम सिंहने 'लास्‍ट मॅन स्‍टँड फाइट' कॉन्‍ट्रॅक्‍ट साइन केला होता. हा कॉन्ट्रॅक्ट साइन करणारा तो पहिलाच भारतीय होता. या कॉन्ट्रॅक्टनुसार या फाईटमध्ये जखमी अथवा मृत्यू झाल्यास आयोजक जबाबदार नसतात. 

बातम्या आणखी आहेत...