आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या आठवणीत भावुक झाले अमिताभ, म्हणाले तुम जैसे गए ऐसे भी जाता नहीं कोई...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारीला अकाली निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अकाली जाण्याने बॉलिवूडसोबत त्यांच्या जगभारातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बुधवारी संध्याकाळी शासकिय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. श्रीदेवींच्या मृत्यूची बातमी येण्यापुर्वीच अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले होते. श्रीदेवींवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी संध्याकाळी पुन्हा एक भावनिक ट्वीट केले.

 

काय आहे ट्वीट?
- अमिताभ यांचे ट्वीट असे की,
 "रहने को सदा देहर में आता नहीं कोई       
तुम जैसे गये ऐसे भी जाता नहीं कोई"~   कैफ़ि आज़मी. 

 

- या ट्वीटच्या माध्यमातून अमिताभ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी कैफी आजमी यांचा शेर लिहिला. त्यांनी सांगितले की, हा शेर त्यांना श्रीदेवीच्या अंत्यसंस्कारावेळी जावेद अख्तरने ऐकवला. 
- अमिताभ बच्चन यांनी  'खुदा जवाह (1992)', 'इंकलाब (1984)', 'आखिरी रास्ता (1986)'  चित्रपटांमध्ये श्रीदेवींसोबत काम केलेय.
- श्रीदेवीचा कमबॅक चित्रपट 'इंग्लिश विंग्लिश'(2012) मध्ये अमिताभ बच्चन यांनी पाहूण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. 
- श्रीदेवींच्या अंत्ययात्रेत अमिताभ बच्चनसोबतच त्यांची मुलगी श्वेता बच्चन, पत्नी जया बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन उपस्थित होती.
- 24 फेब्रुवारीला दुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला होता. बुधवारी संध्याकाळी विले पार्लेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

मृत्यूपुर्वी केले होते हे ट्वीट

- श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी येण्यापुर्वीच अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केले होते.

- अमिताभ बच्चन यांचे ट्वीट " न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है  !!"


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अमिताभ यांचे ट्वीट आणि श्रीदेवींसोबतचे काही खास फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...