आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवी मृत्यूप्रकरण : नैसर्गिक मृत्यू की हत्या? दुबई न सोडण्याचे बोनी कपूर यांना आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई/दुबई: कायदेशीर कारवाई पूर्ण न होऊ शकल्याने सोमवारीही श्रीदेवी यांचे पार्थिव त्यांच्या नातेवाइकांना मिळू शकले नाही. मंगळवारी दुपारपर्यंत त्यांच्या शरीरावर लेप लावण्याची प्रक्रिया पूर्ण करून सायंकाळपर्यंत पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवले जाऊ शकण्‍याची शकत्‍या वर्तवण्‍यात येत आहे. श्रीदेवीचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्याने नव्हे तर बाथटबमध्ये बुडून झाल्याचे फॉरेन्सिक अहवालात समोर आले आहे. या अहवालानंतर आता मात्र श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यांचा मृत्यू नैसर्गिक आहे की नाही, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. श्रीदेवी यांचे शनिवारी (24 फेब्रुवारी) रात्री साडे अकराच्या सुमारास दुबईतील जुमेराह अमीरात हॉटेलच्या रुममधील बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. 


बोनी कपूर यांच्या अडचणीत होऊ शकते वाढ... 

- दुबई पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांचीही पोलिसांनी चौकशी केली. आता हे प्रकरण तेथील न्‍यायव्‍यस्‍थेकडे सोपवले आहे. सरकारी वकिलाच्‍या परवाणगी नंतरच श्रीदेवीचे पार्थिव भारतात आणता येणार आहे. त्‍यामुळे आता परिवाराला सरकारी वकिलाच्‍या परवाणगीची प्रतिक्षा आहे.  


- श्रीदेवी या हार्ड ड्रिंक घेत नव्हत्या, असे त्यांच्या जवळच्या व्यक्तींचे म्हणणे आहे. पण फॉरेन्सिक अहवालानुसार त्यांच्या शरीरात मद्याचे कण आढळले होते. श्रीदेवी यांनी एवढे मद्यप्राशन केले, की त्या बेशुद्ध पडल्या, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिस आता बोनी कपूर यांच्याव्यतिरिक्त मोहित मारवाहचे कुटुंबीय आणि हॉटेल स्टाफची चौकशी करत आहे.
- जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत बोनी कपूर यांना दुबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

मेडिकल ट्रीटमेंट आणि सर्जरी डॉक्यूमेंटची चौकशी...
- याशिवाय सरकारी वकील श्रीदेवी यांच्या आतापर्यंतच्या मेडिकल ट्रीटमेंट आणि सर्जरी डॉक्युमेंट्सची चौकशी करत आहे. सोबतच हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

 

पार्थिव भारतात येण्यास लागू शकतो विलंब...
- सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात पोहोचण्यास अजून सहा ते सात तासांचा अवधी लागू शकतो.
- येथे सध्या श्रीदेवी यांच्या शरीरावर केमिकल लेप, बोनी कपूर यांचे जबाब नोंदवणे आणि इतर कायदेशीर प्रक्रिया सुरु आहेत. दुबईहून भारतात येण्यासाठी साडे तीन तासांचा अवधी लागतो. 

 

मुंबईत अनिल कपूर यांच्या घरी पोहोचत आहेत सेलिब्रिटी...
- दुसरीकडे मुंबईत श्रीदेवी यांचे कुटुंबीय, बॉलिवूड कलाकार आणि संपूर्ण चाहतावर्ग त्यांचे पार्थिव भारतात येण्याची वाट बघत आहेत. मागील दोन दिवसांत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी अनिल कपूर यांच्या घरी पोहोचून कपूर कुटुंबीयांचे सांत्वन केले. दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत, व्यंकटेश, सारिका, श्रुती हसन, अक्षरा हसन, ईशान खट्टर. करिश्मा कपूर, कमल हसन, फरहान अख्तर, रणवीर सिंह, दीपिका पदुकोणसह अनेक कलाकार अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले होते. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची निवडक छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...