आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींचे पार्थिव दुबई विमानतळाकडे रवाना, रात्री 10.30 वाजता भारतात पोहोचणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो सौजन्य- खजील टाइम्स, लाल वर्तुळात श्रीदेवींचे पार्थिव असलेली अॅम्बुलन्स - Divya Marathi
फोटो सौजन्य- खजील टाइम्स, लाल वर्तुळात श्रीदेवींचे पार्थिव असलेली अॅम्बुलन्स

श्रीदेवी मृत्यूप्रकरणात त्यांचे पती बोनी कपूर यांना क्लीनचीट मिळाली असून पार्थिव आज रात्री भारतात दाखल होणार आहे. रात्री साडे दहाच्या सुमारास बोनी कपूर आणि अर्जुन कपूर श्रीदेवी यांच्या पार्थिवासह मुंबईत दाखल होतील. खलिज टाइम्सने श्रीदेवींचे पार्थिव अॅम्बूलन्समधून दुबई विमानतळाकडे रवाना होतानाचे छायाचित्र प्रकाशित केले आहे. लेप लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव कपूर कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आले. Sonapur पासून दुबई विमानतळापर्यंतचे अंतर हे 40 मिनिटांचे आहे. एअरपोर्टवरील औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर खासगी विमानाने कपूर कुटुंबीय मुंबईकडे रवाना होतील.  

 

पुढे बघा, संबंधित छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...