आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नईमध्ये झाली श्रीदेवींची प्रार्थना सभा, खुशी-जान्हवीसोबतच दिसले बोनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 24 फेब्रुवारीला श्रीदेवी यांचा दुबईमध्ये हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूच्या 17 दिवशी म्हणजेच रविवारी चेन्नईमध्ये श्रीदेवीच्या आत्म्याच्या शांतिसाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी 6 पासून सुरु असलेली प्रार्थनासभा 7:30 पर्यंत सुरु होती. श्रीदेवी यांच्या चेन्नई येथील घरी त्यांना श्रध्दांजली देण्यासाठी कलाकार पोहोचत होते. दुबईमध्ये श्रीदेवींचा अचानक मृत्यू झाल्यामुळे त्यांचे पोस्टमॉर्टम करुन त्यांचे पार्थिव भारतात आणण्यात आले होते. भारतात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यानंतर पती बोनी यांनी रामेश्वरममध्ये शांतीपाठ करुन घेतला. 


जान्हवी, खुशी आणि बोनीसोबतच कपूर कुटूंबिय
- चेन्नईमध्ये झालेल्या प्रेयर मीटचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये श्रीदेवी यांची मुलगी खुश-जान्हवी, पती बोनी कपूर आणि संपुर्ण कपूर कुटूंबिय यावेळी दिसले.
- या प्रार्थनासभेचा पहिला फोटो डिझायनर मनीष मल्होत्राने शेअर केला होता. या फोटोच्या आजुबाजूची सजावर पांढ-या आणि पिवळ्या फुलांनी केली होती. पांढरा रंग श्रीदेवी यांना आवडत होता.
- श्रीदेवींना श्रध्दांजली देण्यासाठी साउथ स्टार थाला अजित कुमार आपली पत्नी शामिनीसोबत पोहोचला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्रार्थनासभेचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...