आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sridevis Body Likely To Be Handed Over To Family In 3 Hours Arjun Kapoor Heads To Dubai

श्रीदेवी मृत्यूप्रकरण : वडील बोनी कपूर यांना पाठिंबा देण्यासाठी दुबईला पोहोचला अर्जुन कपूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - बोनी कपूर आणि श्रीदेवी, इनसेटमध्ये अर्जुन कपूर - Divya Marathi
फाइल फोटो - बोनी कपूर आणि श्रीदेवी, इनसेटमध्ये अर्जुन कपूर

दुबई/मुंबईः दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव मंगळवारी (27 फेब्रुवारी) उशीरा रात्रीपर्यंत मुंबईत पोहचण्याची शक्यता आहे. श्रीदेवी यांच्या निधनाला 60 तासांहून अधिकचा कालावधी लोटला आहे. पण कायदेशीर बाबींची पुर्तता करण्यासाठी वेळ लागत असल्याने त्यांचे पार्थिव मुंबईत पोहोचण्यास विलंब होतोय. बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना कपूर यांचा थोरला मुलगा अर्जुन कपूर मंगळवारी सकाळी दुबईला रवाना झाला. वडील बोनी कपूर यांना पाठिंबा देण्यासाठी तो आता त्यांच्यासोबत दुबईत आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर श्रीदेवी यांचे निधन बाथटबमध्ये बुडाल्याने झाल्याचे समोर आले आहे. श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने बोनी कपूर ढासळले आहेत. अशा परिस्थिती त्यांना सांभाळण्यासाठी अर्जुन त्यांच्यासोबत आहे.

 

 

 

मेडिकल ट्रीटमेंट आणि सर्जरी डॉक्यूमेंटची चौकशी...

- याशिवाय सरकारी वकील श्रीदेवी यांच्या आतापर्यंतच्या मेडिकल ट्रीटमेंट आणि सर्जरी डॉक्युमेंट्सची चौकशी करत आहे. सोबतच हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

 

पार्थिव भारतात येण्यास लागू शकतो विलंब...
- सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात पोहोचण्यास अजून सहा ते सात तासांचा अवधी लागू शकतो.
- येथे सध्या श्रीदेवी यांच्या शरीरावर केमिकल लेप, बोनी कपूर यांचे जबाब नोंदवणे आणि इतर कायदेशीर प्रक्रिया सुरु आहेत. दुबईहून भारतात येण्यासाठी साडे तीन तासांचा अवधी लागतो. 

 

मुंबईत अनिल कपूर यांच्या घरी पोहोचत आहेत सेलिब्रिटी...
- दुसरीकडे मुंबईत श्रीदेवी यांचे कुटुंबीय, बॉलिवूड कलाकार आणि संपूर्ण चाहतावर्ग त्यांचे पार्थिव भारतात येण्याची वाट बघत आहेत. मागील दोन दिवसांत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी अनिल कपूर यांच्या घरी पोहोचून कपूर कुटुंबीयांचे सांत्वन केले. दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत, व्यंकटेश, सारिका, श्रुती हसन, अक्षरा हसन, ईशान खट्टर. करिश्मा कपूर, कमल हसन, फरहान अख्तर, रणवीर सिंह, दीपिका पदुकोणसह अनेक कलाकार अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले होते. 

 

पुढे बघा, संबंधित छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...