आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला दत्तक घेतल्याच्या 7 महिन्यानंतर जुळ्या मुलांची आई बनली सनी लियोनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मुलगी निशा कौरला दत्तक घेतल्यानंतर सनी लियोनी आणि डेनियल वेबरने पुन्हा एकदा आपल्या फॅन्सला गुडन्यूज दिली आहे. सनी काही आठवड्यांपुर्वी जुळ्या मुलांची आई बनली. तिने आणि डेनियलने आपल्या दोन मुलांचे नाव अशा(Ashar) सिंह वेबर आणि नूह(Noah) सिंह वेबर असे ठेवलेय. सनीने ट्वीटरवर ही पोस्ट केली आहे. ट्वीटर वर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती आणि डेनियल दोन्ही मुलांसोबत दिसत आहेत.


सनीने एक लेटरही पोस्ट केले...
- फोटोसोबत सनीने एक लेटरही पोस्ट केलेय. यामध्ये तिने लिहिले की, "देवाचा प्लान! 21 जून 2017 चा तो दिवस, ज्यावेळी मला आणि डेनियलला कळाले की, आम्हाला तीन मुलं असणे शक्य आहे. आम्ही प्लान केला आणि फॅमिली बनवण्याचा प्रयत्न केला."
- " अनेक वर्षांनंतर अशार सिंह वेबर, नूह सिंह वेबर आणि निशा कौर वेबरसोबत आमचे कुटूंब पुर्ण झाले. आमच्या मुलांचा जन्म काही आठवड्यांपुर्वीच झाला. परंतू ते आमच्या मनात आणि डोळ्यांत अनेक वर्षांपासून जिवंत होते."
- " देवाने आमच्यासाठी काही खास प्लान बनवला आहे आणि आम्हाला मोठे कुटूंब दिलेय. आम्ही आता तीन सुंदर मुलांचे प्राउड पॅरेंट्स आहोत. सर्वांसाठी सप्राइज..."


मुलीला घेतले दत्तक, तर सरोगेसीव्दारे मुलांचा जन्म
- जुलै 2017 मध्ये सनी आणि देबियलने महाराष्ट्रातील लातूरातून मुलगी निशा कौरला दत्तक घेतले. यासाठी त्यांनी दोन वर्षांपुर्वीच अप्लाय केले होते.
- तर रिपोर्ट्सनुसार मुलगा अशार आणि नूहचा जन्म सेरेगेसीच्या माध्यमातून झालाय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सनीची पोस्ट आणि मुलीला दत्तक घेतानाचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...