आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेष्ठ अभिनेत्री शम्मी यांच निधन, वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रसिध्द बॉलिवूड आणि दूरदर्शन अभिनेत्री शम्मी यांचे निधन झाले आहे. त्या 87 वर्षांच्या होत्या. प्रसिध्द फॅशन डिझायनर संदीप खोसला यांनी सोशल अकाउंटवरुन ही माहिती दिली.  आपल्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिध्द असेल्या या तारकेने जवळपास 200 चित्रपटांमध्ये काम केलेय. यामध्ये 'कूलि नं. 1', 'हम', 'गोपी किशन', 'हम साथ साथ है' या हिट चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपटांसोबतच टीव्हीवर त्यांनी काम केलेय.

 

- 24 एप्रिल 1929 मध्ये गुजरात राज्यातील पारशी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. उस्ताद पेट्रो हा त्यांचा पहिला चित्रपट होता. सुरुवातीला काही मोजक्या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारल्यानंतर त्यांनी सहायक अभिनेत्री म्हणून दोनशेहून जास्त चित्रपटात काम केले. मल्हार, संगदिल, पहिली झलक, कंगन, बंदिश, आझाद दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटातील त्यांच्या भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहतील.


फॅशन डिझायन संदीप यांनी मंगळवारी सकाळी सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करत त्यांना श्रध्दांजली वाहिली. यासोबत संदीपने लिहिले की, sandeepkhoslawewillmissyou #you #will #always #remain #special #to #us #RIP #ShammiAunty #1929-2018 #loveyou #abujanisandeepkhosla #bestfriend #guide #family

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा त्यांचे निवडक फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...