आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या राजकीय इतमामातील अंत्यसंस्कारावर प्रश्नचिन्ह, जाणून घ्या कोणाला मिळता हा सन्मान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीदेवीचे पार्थिव तिरंग्यात लपेटलेले होते. (फाइल) - Divya Marathi
श्रीदेवीचे पार्थिव तिरंग्यात लपेटलेले होते. (फाइल)

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रीदेवीच्या अंत्यसंस्कारावर गुढीपाडवा मेळाव्यात प्रश्न उपस्थित केले होते. श्रीदेवीचे पार्थिव तिरंग्यात ठेवण्यात आले आणि तिला राजकीय सन्मान द्यावा असे तिने कोणते कार्य केले होते, असा सवाल राज यांनी केला होता. 24 फेब्रुवारी रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये दारुच्या नशेत बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईत तिच्या पार्थिवावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. 

 

काय म्हणाले होते राज ठाकरे? 
- मनसेचा गुढीपाडवा मेळावा रविवारी सायंकाळी मुंबईतील शिवतिर्थावर झाला होता. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारचा खरपूस समाचार घेतला होता. 
- नीरव मोदीच्या घोटाळ्यावरुन नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी मीडियाने रात्रंदिवस लावून धरल्याचा आरोप राज यांनी केला होता. 
- जस्टिस लोया यांचा मृत्यू देखील संशयास्पद होता, मात्र ही बातमी मीडियाने कधी दाखवली नाही, असा टोलाही त्यांनी माध्यमांना लगावला होता. 
- वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल्स ही मोदी-शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला होता. 
- ते म्हणाले होते, 'श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला होता. ती खूप दारु प्यालाचे नंतर समोर आले होते. असे असताना महाराष्ट्र सरकारने तिचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून आणले आणि राजकीय सन्मान दिला होता. ही सरकारची मोठी चूक होती.'

 

कोणाला मिळतो राजकीय सन्मान 
- भारतामध्ये काही विशिष्ट व्यक्तींना मृत्यूनंतर राजकीय सन्मान देण्याची परंपरा आहे. राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, माजी पंतप्रधान, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री यांच्यासह आजी-माजी केंद्रीय मंत्री यांच्यासोबत राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, कला-मनोरंजन या क्षेत्रांमध्ये विशेष योगदान दिलेल्या व्यक्तींना राजकीय सन्मान दिला जाऊ शकतो. 
- याशिवाय कोणाला राजकीय सन्मान द्यायचा हा केंद्र आणि राज्य सरकारचा अधिकार आहे. राज्यकर्त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर ते अवलंबून असते. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय असते राजकीय सन्मानाची प्रक्रिया 

बातम्या आणखी आहेत...