आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमदार डायलॉग आणि देशभक्ती दर्शवतो 'गोल्ड'चा ट्रेलर, मौनी रॉय पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'गोल्ड'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या 2 मिनिटे 19 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये अक्षय एका बंगाली देशभक्ताच्या रुपात दिसतोय. यासोबतच यामध्ये देशभक्तीने प्रेरित डायलॉग्स आहेत. टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. तिचीही झलक चित्रपटात पाहायला मिळते. 'गोल्ड'ची कथा ही एका हॉकी कोचच्या अवती-भोवती फिरताना दिसते. त्याला भारताला ओलेंपिकमध्ये गोल्ड मिळवण्याची इच्छा आहे. या कोचचे स्वप्न आहे की, त्याने इंग्रजांच्या घरात जाऊन त्यांना हरवावे आणि भारतासाठी गोल्ड मेडल जिंकावा.


चित्रपटात अक्षय कुमार आणि मौनी रॉय आहेत. यासोबतच अमिध साध आणि 'मुक्काबाज' फेम विनीत सिंह दिसत आहेत. चित्रपटात एक डायलॉग आहे. हमारे घर में इंकलाब जिंदाबाद पहले होता है, फिर नाश्ता होता है. एका ठिकाणी अमित साध म्हणतो की, जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी पहिलेच सांगतिले की, तुमच्या घरात 'सेंटर फॉरवर्ड' जन्मला आहे. चित्रपटाचे डायरेक्शन आणि स्टोरी रीमा कागती यांची आहे. तर रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर प्रोड्यूसर आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...