आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Gold Song: 18 वर्षे लहान TV अभिनेत्री मौनीसोबत रोमान्स करताना दिसला अक्षय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : अक्षय कुमार आणि मौनी रायचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'गोल्ड'चे पहिले गाणे 'नैनो ने बांधी...' रिलीज झाले आहे. गाण्यात 32 वर्षांच4 टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयसोबत 50 वर्षांचा अभिनेता अक्षय कुमार रोमान्स करताना दिसतोय. गाण्यात दोघांची चांगलीच केमिस्ट्री पाहायला मिळतेय. दोघांमध्ये प्रेमपुर्ण वाद पाहायला मिळतोय. हे गाणे अर्को मुखर्जीने गायले आहे. 'गोल्ड' चित्रपटातून मौनी बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. अक्षय आणि मौनीसोबतच चित्रपटात अमित साध, कुणाल कपूर आणि विनीत कुमार सिंहची प्रमुख भूमिका आहे. चित्रपटाची डायरेक्टर रीमा कागदी आहे. चित्रपटाची कथा 1948 च्या ओलंपिकमध्ये भारताने जिंकलेल्या पहिल्या गोल्ड मेडलवर आधारित आहे. चित्रपट याचवर्षी ऑगस्ट 15 मध्ये रिलीज होईल.

बातम्या आणखी आहेत...