आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photoshoot: जान्हवी-ईशानचे मॅगझीनसाठी फोटोशूट, व्हिडिओमध्ये दिसली दोघांची जबरदस्त बॉन्डिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरने फॅशन मॅगझीन हार्पर बाजारसाठी फोटोशूट केले आहे. मॅगझीनचा इश्यू जुलै-ऑगस्ट महिन्यासाठी आहे. या फोटोशूटचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दोघांची जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळतेय. व्हिडिओच्या सुरुवातीला जान्हवी आणि ईशान तयार होताना दिसत आहे. यानंतर दोघं मस्ती मूडमध्ये एकमेसांना छेडताना दिसतात. व्हिडिओमध्ये एका ठिकाणी जान्हवी खळखळून हसताना दिसतेय. तर एका ठिकाणी ईशान डान्स करताना दिसतोय. या मॅगझीनने दहाव्या वर्षपुर्तीला जान्हवी-ईशानला कव्हरवर स्थान दिले आहे. मॅगझीनच्या कव्हर पेजवर जान्हवी खुप सुंदर दिसतेय. ईशानही हँडसम दिसतेय. कव्हरवर जान्हवीने रेड कलरचा स्कर्ट आणि व्हाइट टॉप घातला तर ईशान ग्रीन आणि ब्राउन कलरच्या सूटमध्ये आहे. जान्हवी आणि ईशानचा आगामी 'धडक' हा चित्रपट येत्या 20 जुलैला रिलीज होणार आहे. चित्रपटाचे डायरेक्टर शशांक खेतान आहेत. तर करण जोहर धर्मा प्रोडक्शनमधून या चित्रपटाची निर्मिती करत आहे. हा चित्रपट मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट 'सैराट'चा रिमेक आहे.
 

बातम्या आणखी आहेत...