आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFA 2018: बँकॉकच्या मॉलमध्ये फॅन्सला भेटायला पोहोचला वरुण, केला डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक : बँकॉकमध्ये 19 व्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स (IIFA) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडचे अनेक सेलेब्स या इव्हेंटमध्ये पोहोचले. या वेळी शनिवारी वरुण धवन बँकॉकच्या एका मॉलमध्ये पोहोचला. एमक्वार्टियर मॉलमध्ये वरुणला भेटण्यासाठी शेकडोंच्या संख्येने फॅन्स पोहोचले. येथे वरुणने फॅन्ससोबत मस्ती केली आणि आपल्या चित्रपटाच्या काही गाण्यांवर डान्सही केला. वरुणने 'जुडवां 2'चे गाणे 'टन टना टन...', यासोतबच 'बद्रीनाथ की दुल्हनिया' मधील 'उसको बनाकर ले जाएंगे बद्री की दुल्हनियां...' आणि 'मै तेरा हिरो'चे गाणे 'तेरा ध्यान किधर है तेरा हीरो इधर है..' या गाण्यांवर डान्स केला. वरुणसोबत त्याच्या चाहत्यांनीही ठेका धरला. IIFA अवॉर्ड सोहळा हा रविवारी रात्री पार पडला. यावेळी अर्जुन कपूर, श्रध्दा कपूर बॉबी देओल मंचावर थिरकताना दिसले. यासोबतच रेखा यांनीही तब्बल 20 वर्षांनंतर स्टेजवर परफॉर्मेंस दिला. 

 

पाहा वरुण धवनचा व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...