आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

The accidental prime minister: दिल्ली शेड्यूल पुर्ण, अनुपम खेर यांनी शेअर केला अनुभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या आयुष्यावर 'द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर'  हा चित्रपट तयार होतोय. या चित्रपटाचे दिल्ली शेड्यूल पुर्ण झाले आहे. चित्रपटात डॉ. मनमोहन सिंह यांची भूमिका अनुपम खेर साकारत आहेत. त्यांनी ट्वीट करुन चित्रपटाचे दिल्ली शूट कम्प्लीट झाल्यावर फोटो शेअर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनुपम खेर हे शूटिंगसाठी एनएसडी येथे गेले होते. तिथल्या काही आठवणी ताज्या करत त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केल्या होत्या.


चित्रपटात आहेत 140 पेक्षा जास्त कलाकार
हा चित्रपट डॉ. मनमोहन सिंहच्या कार्यकाळा दरम्यान त्यांचे मीडिया सल्लागार राहिलेले संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटात 140 पेक्षा जास्त कलाकार राजकारण्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
- अनुपम खेर वेळोवेळी या कलाकारांना भेटवण्यासाठी त्यांचे फोटो ट्वीटरवर शेअर करत असतात.


डिसेंबरमध्ये रिलीज होणार चित्रपट 
हा चित्रपट 21 डिसेंबर 2018 ला रिलीज होईल. चित्रपटाचे प्रोडक्शन बोहरा ब्रदर्स करत आहेत. स्क्रिप्ट मयंक तिवारी यांनी लिहिले आहे. तर डायरेक्शन विजय रत्नाकर गुट्टे करत आहेत. चित्रपटाचे क्रिएटिव्ह डायरेक्शन हंसल मेहता करत आहेत.
- चित्रपटात संजय बारु यांच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे. संजयचे पुस्तक 2014 मध्ये आले होते. तेव्हा या पुस्तकात लिहिलेल्या अनेक गोष्टींमुळे वाद झाले होते.

 

बातम्या आणखी आहेत...