आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री आयशा टाकियाला मिळत आहेत धमकीचे मॅसेज, नव-याने पीएम मोदीला मागितली मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री आयशा टकियाला फोनवर सतत धमक्या मिळत आहेत. आयशा टाकियाचे पती आणि समाजवादी पार्टीचे नेता अबू आजमीचा मुलगा फरहान आजमीने मुंबई पोलिसांना मदत मागितली आहे. फरहानने ट्वीटमध्ये नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराजलाही टॅग केले आहे. फरहानने ट्वीटमध्ये लिहिले की, "माझी पत्नी, आई आणि बहीण यांना एक अनोळखी व्यक्ती त्रास देत आहे. यासोबतच फरहानने मुंबई पोलिस काहीच अॅक्शन घेत नाही असा आरोपही लावला आहे."


फरहानने लिहिले की - मुंबई पोलिसचे डीसीप दाहिया माझे फोन कॉल्स आणि मॅसेजचे उत्तर देत नाहीये. त्यांनी माझी पत्नी, आई आणि बहिणीचे बँक अकाउंट जबरदस्तीने ब्लॉक केले आहेत. यासोबतच फरहानने डीसीपी दहियासोबत झालेल्या बोलण्याचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले आहेत.


यानंतर फरहानला जॉइंट कमिश्नर ऑफ पोलिस देवेन भारतीने फोन केला आणि मदत केली. हे सुध्दा फरहानने ट्वीटरवर शेअर केले आहे. रिपोर्ट्सनुसार, फरहानवर त्याचा Ex बिझनेस पार्टनर काशिफ खानने एफआयआर दाखल केला आहे. काशिफने फरहानवर फसवणूकीचा आरोप लावला आहे. हाच व्यक्ती फरहानच्या कुटूंबीयांना त्रास देतोय असे मानले जातेय. 


कोण आहे आयशा टाकिया?
आयशा टाकियाने 2004 मध्ये आलेल्या  'टार्जन: द वंडर कार' या चित्रपटातून डेब्यू केला होता. यानंतर ती शाहिद कपूरसोबत 'दिल मांगे मोर' चित्रपटात दिसली होती. अभय देओलसोबत तिने  'सोचा न था' (2004) हा रोमँटिक चित्रपट केला. हा प्रेक्षकांना खुप आवडला. 2009 मध्ये आलेल्या 'वॉन्टेड' चित्रपटातून ती सलमान खानसोबत दिसली होती. 2009 मध्ये आयशाने रेस्तरॉ ओनर आणि समाजवादी पार्टीचा नेता अबू आजमीचा मुलगा फरहान आजमीसोबत लग्न केले. यानंतर ती चित्रपट सृष्टीपासून दूर राहिली. 2013 मध्ये तिने मुलाला जन्म दिला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फरहानने केलेले ट्वीट...
 

बातम्या आणखी आहेत...