आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo: बिहारचे डीएम अनिरुध्द भोजपुरी चित्रपटात करत आहेत काम, समोर आले फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बिहारच्या खगडिया जिल्ह्याचे डीएम अनिरुध्द कुमार सध्या 'वायरस' या भोजपुरी चित्रपटात काम करत आहेत. त्यांनी भोजपुरी चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्री निशा दुबेसोबत एक आयटम नंबर शूट केला आहे. याचे काही फोटोज समोर आले आहेत. अनिरुध्दने गेल्या काही दिवसांपुर्वी एका न्यूज वेबसाइटला सांगितले होत की, ते वयाच्या 10 व्या वर्षापासून अभिनय करत आहेत. त्यांनी अनेक स्टेज शोमध्ये परफॉर्म केला आहे. 'वायरस' चित्रपटापुर्वी त्यांनी भाजपुरी चित्रपट 'मुंबइया लडकी, देसी बबुआ'(2012) मध्ये हीरोच्या वडिलांची भूमिका साकारली होती.


2020 मध्ये रिटायर होत आहे अनिरुध्द
- अनिरुध्दने 1882 मध्ये पहिल्यांदा बीपीएससी परीक्षा क्रॅक केली आणि ते रजिस्ट्रार बनले. 1983 मध्ये पुन्हा परिक्षा दिल्यानंतर त्यांना डेप्टी कलेक्टरची पोस्ट मिळाली. 2016 मध्ये त्यांचे प्रमोशन झाले आणि ते डीएम बनले. अनिरुध्दनुसार, सरकारी कामातून जेव्हा वेळ मिळतो. तेव्हा ते कुटूंब आणि चित्रपट यांना वेळ देतात. 2020 मध्ये ते रिटायर होणार आहेत. यानंतर ते पुर्ण वेळ चित्रपटांना देणार आहेत. अनिरुध्द यांना चार मुलं आहेत. एका मुलाने आयएसची परिक्षा क्रॅक केली आहे आणि पुढची तयारी करतोय. दूसरा मुलगा बीआयटी मेसरामधून इंजीनियरिंग करतोय.


'वायरस'चे लीड अॅक्टर असणार आशी तिवारी
- या चित्रपटात आशी तिवारी प्रमुख भूमिकेत आहेत. आशी तिवारी नवोदित भोजपुरी कलाकार आणि सिंगर आहे. त्याने दिल्लीमधून शिक्षण घेतलेय. यासोबतच मॅनेजमेंटची प्रोफेशनल ट्रेनिंग घेतली आहे. परंतू तिथे त्याचे मन लागले नाही तो अभिनयासाठी मुंबईमध्ये आला. यानंतर त्याने टीव्हीवर पत्रकार म्हणून काम केले आणि यशस्वी टीव्ही सीरीज 'बाते अनकही'चे डायरेक्शन केले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

 

 

बातम्या आणखी आहेत...