आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : अभिनेता बॉबी देओल याने नुकतेच 'रेस 3' चित्रपाटतून कमबॅक केले. आता तो कुटूंबासोबत व्हॅकेशनसाठी रवाना झाला आहे. बुधवारी तो मुंबई एयरपोर्टवर दिसला. यावेळी बॉबी संपुर्ण कुटूंबासोबत दिसला. विशेष म्हणजे नेहमीच लाइमलाइपासून दूर राहणारा त्याचा मुलगा मीडियासमोर पोज देताना दिसला. त्याने मुलासोबत पोज दिल्या. यासोबतच तो पत्नी तान्यासोबतही फोटो काढून घेताना दिसला. धाकटा मुलगा धरम याने त्याच्यासोबत फोटो काढला नाही. यावेळी बॉबी म्हणाला की, धरम फोटोज काढण्यासाठी लाजतो.
अनेक कारमधून एयरपोर्टवर पोहोचली देओल कुटूंबीय...
- 'रेस-3' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर बॉबीने स्वतःला 1.20 कोटींची रेंज रोवर कार गिफ्ट केली होती. याच कारमधून संपुर्ण देओल कुटूंब बुधवारी एयरपोर्टवर पोहोचले.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार 'रेस-3' साठी बॉबीला जवळपास 7.50 कोटी रुपये दिले आहेत.
- बॉबीला लग्जरी कार आणि बाइक्सचा शौक आहे. त्याच्या जवळ लँड रोवर, फ्रीलँडर 2, रेंज रोवर वोग, मर्सिडीज-बेन्ज एस-क्लास, पोर्शे कायोन सारख्या लग्जरी कार आहेत.
- 'यमला पगला दीवाना फिर से' आणि 'हॉउसफुल 4' हे बॉबीचे आगामी चित्रपट आहेत.
IIFA 2018 मध्ये बॉबीच्या मुलाने तिला पहिला पब्लिक अपीयरेन्स
- बॉबी देओलचा मुलगा आर्यमान देओल लाइमलाइटपासून नेहमीच दूर राहतो. त्याने पहिल्यांदा वडिलांसोबत पब्लिक अपीयरेंस दिला होता. 21 वर्षांचा आर्यमान हा वडील बॉबीसोबत IIFA 2018 च्या अवॉर्ड शोमध्ये पोहोचला होता.
- बॉबी देओलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुलांना लाइमलाइटपासून दूर ठेवण्याविषयी सांगितले होते.
- तो म्हणाला होता, "प्रायव्हसी खुप गरजेची असते. आजकाल पैपराजी कल्चरमुळे हे संपले आहे. माझा मुलगा सध्या शिक्षण घेत आहे."
- "त्याला बॉलिवूडमध्ये यायची इच्छा आहे की, नाही याविषयी मला माहिती नाही. जर तो या क्षेत्रात आला तर मीडिया लाइमलाइटचा नक्कीच वापर करेल."
बॉबीची बायको तान्याही लाइमलाइटपासून राहते दूर
- बॉबी देओलने 'रेस 3' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. यासाठी त्याला पत्नी तान्या आणि मुलांनी मोटिवेट केले.
- बॉबीने बिझनेसमनची मुलगी तान्या आहूजासोबत लग्न केले. 30 मे 1996 मध्ये त्याचे लग्न झाले. दोघांना आर्यमान(थोरला) आणि धरम(धाकटा) हे मुलं आहेत.
- तान्याचा 'द गुड अर्थ' च्या नावाने स्वतःचा फर्नीचर आणि इंडीरिअर डेकोरेशनचा बिझनेस आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स आणि बिझनेसमन तिचे क्लाइंट आहेत.
- तान्यानुसार, बॉबी तिच्या कामात जास्त डोक घालत नाही. देओल कुटूंबीय खुप सपोर्टिव्ह आहेत.
- तान्या ग्लॅमरच्या जगतापासून नेहमी दूर राहते. ती बॉलिवूडच्या पार्टीजमध्ये खुप कमी दिसते. परंतू संजय कपूरची पत्नी महीप आणि सोहेल खानची पत्नी सीमा तिच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा एयरपोर्टवरली बॉबी देओलचे कुटूंबासोबतचे PHOTOS...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.