आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सत्यमेव जयते'वर वाद, धार्मिक भावना दुखावल्यामुळे एफआयआर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते चित्रपट रिलीज पुर्वीच वादात अडकताना दिसतोय. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या धार्मिक सणांच्या दृष्यांमुळे हैदराबादमध्ये जॉन अब्राहम आणि चित्रपटाच्या टीमवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सत्यमेव जयते चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप जावेरी करत आहेत. चित्रपटात जॉनसोबतच मनोज वाजपेयी आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यातच चित्रपटाचे ट्रेलर आणि पोस्टर रिलीज झाले. 


यामुळे दाखल करण्यात आला एफआयआर
एका वृत्तपत्रानुसार बीजेपी नेता सैयद अली जाफरी यांनी हा एफआयआर दाखल केला आहे. शिया समुदायच्या भावना कथित रुपात दुखावल्यामुळे जॉनच्या या चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बीजेपी अल्पसंख्याक फ्रंटचे महासचिव सैयद अली खानने हैदराबादमध्ये केस दाखल केली आहे. 
- सैयदने तक्रारीत लिहिले की, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शिया समुदायाचा सण मुहर्रम हा चुकीच्या पध्दतीने दाखवला आहे. चित्रपटच्या ट्रेलरमध्ये एक सीन आहे. यामध्ये शिया समुदायाचे सदस्य दुःखा (मातम) मध्ये दिसतात. 
- जाफरी यांनी सांगितले की, "मातमी जुलूस का सहारा लेते हुए फिल्म का अभिनेता एक खून करता है। इससे हमारी भावनाएं आहत हुई हैं।"

 

विरोध प्रदर्शन करणार
बीजेपी नेता सैयद अलीने सीबीएससीच्या मुंबई येथील ऑफिसमध्येही तक्रार केली आहे. हे दृष्य चित्रपटातून काढण्यात यावे अशी सयदची मागणी आहे. जर हा सीन चित्रपटातून काढला नाही तर सैयद हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही. यासोबतच देशभरात विरोध प्रदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

चित्रपटातून दाखवण्यात आला आहे भ्रष्टाचार
- या केससंबंधीत वकीलाने एका न्यूज वेबसाइटला जबाब देताना सांगितले की, हा चित्रपट भ्रष्टाचाराची कथा आहे. यामुळे हा चित्रपट मुहर्रम जुलूस न दाखवताही चित्रीत केला जाऊ शकत होता. या सणासोबत कथेचा काहीच संबध नाही. 
- या दृष्याने एका विशेष धर्म संप्रदायाच्या भावना दुखावल्या जातात. यामुळे हे दृष्य चित्रपटातून काढलेले चांगले राहिल.

बातम्या आणखी आहेत...