आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Poster: 'सोनचिडिया' चित्रपटाचे पोस्टर रिलीज, फेब्रुवारी 2019 मध्ये होणार रिलीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : चंबलच्या डाकूंवर तयार होत असणारा चित्रपट 'सोनचिडिया'चे फर्स्ट पोस्टर रिलीज झाले आहे. पोस्टरमध्ये सुशांत सिंह राजपूतसोबतच मनोज बाजपेयी, रणवीर शौरी दिसणार आहेत. डाकू बनलेल्या अॅक्टर्सची फौज एकत्र उभी असल्याचे पोस्टरमध्ये दिसतेय. तर  'बैरी बेईमान, बागी सावधान'अशी या पोस्टरमध्ये पंच लाइन आहे. सोनचिडियाचे डायरेक्शन अभिषेक चौभे करत आहेत. पोस्टरमध्ये दिसतेय की चित्रपट हा 8 फेब्रुवारील 2019 ला रिलीज होतोय.


चंबलच्या डाकूंवर अनेक चित्रपट
चित्रपटात सुशांतच्या अपोजिट भूमी पेडनेकर आणि आशुतोष राणा प्रमुख भूमिकेत असणार आहेत. चंबलच्या डाकूंवर यापुर्वी पान सिंह तोमर हा चित्रपट तयार झाला आहे. यामध्ये इरफान खान प्रमुख भूमिकेत होता.
- यापुर्वी 'बेंडिट क्वीन', सनी देओलचा चित्रपट 'डकैत' आणि सैफ अली खानच्या 'बुलेट राजा' चित्रपटाची काही शूटिंगही चंबलमध्येच झाली होती.

 

या चित्रपटांमध्येही सुशांतचा जलवा
सोनचिडियासोबतच सुशांत सिंह राजपूत सारा अली खानसोबत केदारनाथ चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचे डायरेक्शन अभिषेक कपूरने केले आहे. 'केदारनाथ' 2013 मध्ये उत्तराखंडात आलेल्या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाची शूटिंग नुकतीच पुर्ण झाली. केदारनाथ 30 नोव्हेंबर 2018 ला रिलीज होणार आहे.
- यासोबतच सुशांत सिंह, जॅकलीन फर्नांडीजसोबत अॅक्शन फिल्म 'ड्राइव्ह'मध्येही दिसणार आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर 2018 ला रिलीज होईल.

 

बातम्या आणखी आहेत...