आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFA 2018: 20 वर्षांनी स्टेजवर अवतरलेल्या रेखा यांनी दिलखेचक अदांनी केले सा-यांना घायाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टेजवर डान्स परफॉर्मेंस देताना रेखा - Divya Marathi
स्टेजवर डान्स परफॉर्मेंस देताना रेखा

बँकॉक :19 वा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड(IIFA) सोहळा बँकॉकमध्ये रंगला. 22 ते 24 जून या काळात हा अवॉर्ड सोहळा झाला. या सोहळ्यात अभिनेत्री रेखा यांनी यांच्या दिलखेचक अदांना सर्वांना घायाळ केले. तब्बल 20 वर्षांनंतर त्यांचा नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी  'सलाम-ए-इश्क…' या प्रसिध्द गाण्यावर रेखा यांनी ठेका धरला आणि पुन्हा एकदा त्यांच्या अदांनी उपस्थितांची मने जिंकली.

 

तब्बल 20 वर्षांनंतर स्टेज परफॉर्मेंस
बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा या यावेळी आयफा अवॉर्ड्समध्ये स्टेज परफॉर्मेंस दिला. त्यांनी 20 वर्षांपुर्वी 31 जानेवारी 1998 मधील 43 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये शेवटचा स्टेज परफॉर्मेंस दिला होता. त्यावेळी त्यांनी 'ये क्या शहर है दोस्तों', 'इन आंखों की मस्ती', 'सलाम-ए-इश्क' आणि 'दिल चीज क्या है' सारख्या गाण्यांवर डान्स केला होता.

 

रेखांसोबतच यांनीही दिला स्टेज परफॉर्मेंस
वरुण धवन, रणबीर कपूर, शाहिद कपूर, कृती सनोन, यूलिया वंतूर, श्रद्धा कपूर, अर्जुन कपूर, बॉबी देओल, क्रिती सनोन, यूलिया वंतूर, प्रीतम, श्रीराम चंद्रा, अमित मिश्रा, शाल्मली खोलगडे, अंतरा मित्रा, नकाश अझीझ, निकिता, वाणी कपूर, नुसरत भरुचा आणि इतर अनेक जणांने आपल्या कलाकारीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रेखा यांच्या अदा...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...