आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IIFA Award 2018 : Sridevi Won Best Actress Award, Irrfan Khan Best Actor For Hindi Medium

IIFA 2018: श्रीदेवी ठरल्या सर्वोकृष्ट अभिनेत्री, तर इरफानला बेस्ट अॅक्टर पुरस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक : 19 वा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड(IIFA) सोहळा बँकॉकमध्ये पार पडला. 22 ते 24 जून या काळात हा अवॉर्ड सोहळा झाला. 24 जून रोजी संध्याकाळी पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी तुम्हारी श्रीदेवी यांना त्यांच्या मॉम चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार पती बोनी कपूर यांनी स्विकारला. 

 

यांना मिळाले पुरस्कार
1. बेस्ट अॅक्ट्रेस अवॉर्ड (मॉम) - श्रीदेवी
2. बेस्ट अॅक्टर (हिंदी मिडियम) - इरफान खान
3. सर्वोकृष्ट चित्रपट - तुम्हारी सुलू
4. बेस्ट डायरेक्टर (हिंदी मिडियम) - साकेत चौधरी 
5. बेस्ट सपोर्टींग अॅक्टर (सिक्रेट सुपरस्टार) - मेहेर वीज 
6. बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर (मॉम)- नवाजुद्दीन सुध्दीकी
7. आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड - अनुपम खेर
8. बेस्ट म्यूझिक डायरेक्शन अवॉर्ड (बद्रिनाथ की दुल्हनिया) - अमल मलिक, तनिष्क बागची, अखिल सचदेव
9. बेस्ट डेब्यूट डायरेक्टर अवॉर्ड (डेथ इन द गुंज) - कोंकणा सेन 

 

तब्बल 20 वर्षांनंतर स्टेज परफॉर्मेंस
बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा या यावेळी आयफा अवॉर्ड्समध्ये स्टेज परफॉर्मेंस दिला. त्यांनी 20 वर्षांपुर्वी 31 जानेवारी 1998 मधील 43 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये शेवटचा स्टेज परफॉर्मेंस दिला होता. त्यावेळी त्यांनी 'ये क्या शहर है दोस्तों', 'इन आंखों की मस्ती', 'सलाम-ए-इश्क' आणि 'दिल चीज क्या है' सारख्या गाण्यांवर डान्स केला होता.

 

रेखांसोबतच यांनीही दिला स्टेज परफॉर्मेंस
वरुण धवन, रणबीर कपूर, शाहिद कपूर, कृती सनोन, यूलिया वंतूर, श्रद्धा कपूर, अर्जुन कपूर, बॉबी देओल, क्रिती सनोन, यूलिया वंतूर, प्रीतम, श्रीराम चंद्रा, अमित मिश्रा, शाल्मली खोलगडे, अंतरा मित्रा, नकाश अझीझ, निकिता, वाणी कपूर, नुसरत भरुचा आणि इतर अनेक जणांने आपल्या कलाकारीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

बातम्या आणखी आहेत...