आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरकटलेल्या तरुणाची भूमिका साकारण्यासाठी प्रतीकने केला दहशतवादी डेव्हिडवर रिसर्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : प्रतीक बब्बर अनुभव सिन्हाच्या 'मुल्क'मध्ये दिसणार आहे. या कोर्टरूम ड्रामा चित्रपटात ऋषी कपूर आणि तापसी पन्नूदेखील दिसतील. हा चित्रपट दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांवर आधारित आहे. प्रतीक बब्बर चित्रपटात अशाच एका भरकटलेल्या तरुणाची भूमिका करत आहे. यात तो शाहिद मोहंमद याची भूमिका साकारत आहे. सूत्राच्या माहितीनुसार, या पात्रासाठी प्रतीकने खूप मेहनत घेतली आहे. त्याने अनेक दहशतवादी लोकांविषयी वाचले आहे. शिवाय अमेरिकी दहशतवादी डेव्हिड हेडलीवर रिसर्च केला आहे. हेडलीने २००८ मध्ये मुंबईत हल्ल्यासाठी वेगवेगळ्या जागांची पाहणी केली होती. या चित्रपटाशी संबंधित लोकांनी सांगितले की, हेडलीवर रिसर्च करण्यासाठी प्रतीक बब्बरने हेडलीचा माहितीपट पाहिला. त्यानंतर त्याची बॉडी लँग्वेजचा अभ्यास केला. विशेष म्हणजे या चित्रपटातील इतर कलाकारांनीदेखील खऱ्या लोकांचा अभ्यास केला आहे. या चित्रपटात आशुतोष राणा पब्लिक प्रॉसिक्युटरच्या भूमिकेत आहेत, तर तापसी पन्नू डिफेन्स म्हणजेच बचाव पक्षाची वकील बनली आहे. या दोघांनी लखनऊमध्ये राहणाऱ्या हायकोर्टाचे रिटायर्ड जज नदीम सिद्दिकी यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. 

 

अनुभव सिन्हा यांनी सांगितले...
'चित्रपटाचा बहुतांश भाग न्यायालयात दाखवला जाणार आहे. त्यामुळे रिसर्च करणे गरजेचे होते. सर्वच कलाकारांनी याला गांभीर्याने घेतले. सर्वांनी आपापल्या पात्रासाठी मेहनत घेतली. यासाठी त्यांनी तीन-तीन महिन्यांचा वेळ मागितला होता.' 

बातम्या आणखी आहेत...