आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिले ऋषी कपूरचा मुलगा म्हणून ओळखायचे, आता तैमूरचा मामा म्हणून ओळखतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेता रणबीर कपूरने एका मुलाखतीत सांगितले की, तैमूरचा खुप मोठा फॅन आहे. तैमूर त्याचा भाचा आहे आणि रणबीर त्याचा मामा आहे. एका एफएम रेडिओला दिलेल्या मुलाखती दरम्यान रणबीर म्हणाला की, 'पहिले लोक मला ऋषी कपूरचा मुलगा म्हणून ओळखत होते. परंतू आता मला लोक तैमूरचा मामा म्हणून ओळखतात. मी आता एखाद्या रस्त्यावरुन जातो तेव्हा लोक मला म्हणतात की, बघा तैमूरचा मामा जात आहे.'


रणबीर पुढे म्हणाला की, पुन्हा पुन्हा असे ऐकून इन्सिक्योरिटी फीलिंग येते. मीसुध्दा तैमूरचा मोठा फॅन आहे. जेव्हा त्याचा एखादा फोटो किंवा व्हिडिओ येतो, तेव्हा खुप मनला चांगले वाटते. तो खुप क्यूट आहे आणि त्याला मिळणा-या अटेंशनसाठी तो योग्य आहे. खरेतर एका बालकाला एवढे अटेंशन मिळू नये, कारण हे त्याच्यासाठी हेल्दी नाही. 

 

तैमूरचा फोटो पाहून कोणतीही मुलगी मनवता येईल
रणबीरने एका मुलाखती दम्यान सांगितले की, 'जर आपण एखाद्या मुलीचा रुसवा दूर करण्याचा प्रयत्न करत असू, तेव्हा तिला तात्काळ तैमूरचा फोटो दाखवा. तैमूर एवढा क्यूट आहे की, मुलीचा रुसवा तात्काळ दूर होईल.'


करीनासोबत माझे कमी बोलणे होते
रणबीरने आपली बहीण करीना आणि मेहूणे सैफ अली खानसोबतच्या नात्याविषयी खुलासा केला. तो म्हणाला की, 'मी आणि करीना जास्त बोलत नाही.  आम्ही कमी भेटतो. मी सैफच्या खुप जवळ आहे. आमची सेंसबिलिटी चांगली आहे. मला त्यांना भेटायला आणि बोलायला छान वाटते.'

 

संजूच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे रणबीर :
सध्या रणबीर कपूर संजय दत्त यांच्या आयुष्यावरील चित्रपट 'संजू'च्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. हा चित्रपट 29 जूनला रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबतच सुनील दत्त यांच्या भूमिकेत परेश रावल आणि आई नरगिसच्या भूमिकेत मनीषा कोइराला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...