आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषी कपूर यांच्या व्यवहारावर बोलला रणबीर - 'मी त्यांना कंट्रोल करु शकत नाही'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क: ऋषी कपूर नेहमची आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपुर्वीच त्यांचा मुलगा रणबीर कपूर एका मुलाखतीत त्यांच्याविषयी बोलला. तो म्हणाला की, "मी अजुनही माझ्या वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाही. फक्त नजर खाली ठेवून त्यांना पाहतो आणि त्यांच्याशी बोलतो आणि फक्त हो म्हणतो. मला अनेक वेळा त्यांना समजावून सांगणे अवघड होते. अशा वेळी मी आई (नीतू कपूर)च्या माध्यमातून मॅसेज पाठवतो आणि माझी समस्या सांगतो. मी अजून काय करु शकतो, मी त्यांना कंट्रोल करु शकत नाही."

'जग्गा सासूस' वादावर बोलला रणबीर : रणबीरने या मुलाखतीत 2017 मधील 'जग्गा जासूस' वादाविषयी आपली प्रतिक्रिया दिली. हा चित्रपट फ्लॉप होण्याचा सर्व दोष ऋषी कपूर यांनी अनुराग बसुवर टाकला होता. ते त्यांना बेजबाबदार म्हणाले होते. यासोबतच ऋषी कपूर एका मुलाखतीत म्हणाले होते की, त्यांनी (अनुराग बसु)ने गज्जा जासूस, जग्गा जासूस बनवला आहे. चित्रपट माझ्या उच्चाराप्रमाणेच खराब आहे.


- दोघंही अनुराग(कश्यप - बॉम्बे वेलवेटचे डायरेक्टर आणि अनुराग बसु) आपल्या चित्रपटात जास्त खोलवर जातात. ते निश्चित बजेटमध्ये चांगला चित्रपट बनवतात. परंतू त्यांना जर जास्त बजेट मिळाला तर ते माकडाच्या हातात खेळणे मिळाल्यासारखे करतात. या लोकांची हीच समस्या असते. हे प्रत्येक डायरेक्टरसोबत होते. कोणाचाही 100 टक्के रेकॉर्ड होऊ शकत नाही.
- रणबीर म्हणाला की, मला स्पेशली अनुराग दादासाठी खुप वाईट वाटले होते. डॅडने प्रीतम दा (जग्गा जासूसचे म्यूझिक डायरेक्टर)ला वाईट बोलले. परंतू मला सहानुभूती आहे.

 

'संजू'च्या यशाने आनंदी आहेत ऋषी
सामान्यतः आपल्या मुलाच्या चित्रपटांची निंदा करणारे ऋषी कपूर हे 'संजू'च्या यशामुळे खुप आनंदी आहेत. काही दिवसांपुर्वीच ऋषी कपूर यांनी ट्वीटरवर मुलाची स्तुती केली होती. त्यांनी लिहिले होते की, "रणबीर तुला माहिती नाही की, एक पालक म्हणून आम्हाला किती गर्व होतोय. असेच चांगले काम करत राहा."

 

बातम्या आणखी आहेत...