आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानवर वयस्कर दाम्पत्याने लावला आरोप, म्हणाले शेजारी बंगला बांधण्यास मनाई करतेय खान कुटूंबीय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खानविषयी एक नवीन वाद समोर आला आहे. एका वयस्कर दाम्पत्याने त्याच्यावर जमीनीसाठी त्रास देत असल्याचा आरोप लावला आहे. हे प्रकरण मुंबईच्या पनवेलमधील आहे. येथे सलमान खानचे फार्महाउस आहे. रिपोर्टनुसार तीन वर्षांपुर्वी हे कपल अमेरीकेतून मुंबईत परतले. वयस्कर दाम्पत्य केतन कक्कड आणि त्यांची पत्नी अनिता कक्कड यांना त्यांच्या पनवेल येथील जमीनीवर बंगला बांधायचा आहे. परंतू सलमान खानकडून त्यांना त्रास दिला जातोय.


दाम्पत्याने 27 लाखांमध्ये खरेदी केली होती जागा
या दाम्पत्यांनी सांगितले की, आम्ही अमेरीकेत होतो तेव्हा एक शेजारी म्हणून सलमानच्या फार्महाउसवर येणे जाणे व्हायचे. आमच्यासोबत चांगला व्यवहार केला जात होता. परंतू आता आम्ही परत येऊन बंगला बांधत आहोत तर आम्हाला त्रास दिला जातोय.
- कक्कड कुटूंबीयांनी सांगितले की, आम्ही सलमानच्या फार्महाउसच्या बाजूची जागा 1996 मध्ये साडे सतरा लाखांना खरेदी केली होती. यासाठी आम्ही सलमानचे वडील सलीम खान यांची परवाणगी घेतली होती. परंतू आता त्या जमीनीचे मालक आम्ही असूनही आम्ही तेथे बंगला बांधू शकत नाहीते.

- दाम्पत्याचा आरोप आहे की, सलमानच्या फार्महाउस जवळ एक गेट लावण्यात  आले आहे. यामुळे आम्हाला आमच्या जमीनीपर्यंत जाण्यास अडचण येत आहे. कक्कड कुटूंबीयांनी सांगितले की, आम्ही वन विभागाच्या अधिका-यांच्या मदतीने खान कुटूंबाविरोधात आवाज उठवला तर त्याचे ट्रान्सफर करण्यात आले. 

 

सलमानच्या घोड्यांसाठीही वीज आहे, परंतू दाम्पत्याची जमीन अंधारात
दाम्पत्यांनी सांगितले की, सलमानच्या घोड्यांसाठीही वीजेची सोय आहे. परंतू आमच्या जमीनीसाठी वीजेसारखी सोय उपलब्ध नाही.
- पीडित कुटूंबीयांनी दावा केला होता की, फॉरेस्ट मिनिस्टर सुधीर मुनगंटीवार यांनी या बाबतीत दखल देण्याची अपील केली होती. त्यांनी त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. परंतू नंतर ते सलमानसोबत पार्टी करताना दिसले.
- दाम्पत्य आणि त्यांचे वकील आभा सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणी अजून कोणतीही सुनवाई झालेली नाही. खान कुटूबींयाकडून याविषीय अजून कोणतीही रिअॅक्शन आलेली नाही. सलमान सध्या यूएसमध्ये 'द-बँग रीलोडेड' टूरमध्ये व्यस्त आहे.

 

बातम्या आणखी आहेत...